Kolhapur : पत्नीसोबतचा वाद टोकाला, पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवून घेतलं, थरार कॅमेऱ्यात कैद
Kolhapur Crime News: शेखर गायकवाड ही माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. यावेळी तो पोलिसांशी बोलत होता आणि न्यायाची याचना करत होता. शेखर गायकवाड यांनी हे पाहिलं तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिवाजी नगरन पोलीस ठाण्यातील थरारक घटना

थरार कॅमेऱ्यात कैद, आग लागल्याचं पाहून सगळेच हादरले

कौटुंबिक वादातून घडली घटना
Kolhapur News:राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना या संतापजन तर आहेतच, मात्र महाराष्ट्र् नेमका कोणत्या दिशेला जातोय, हा सवालही यातून निर्माण होतोय. बीडमध्ये झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, जालना जिल्ह्यात तरूणाला गरम सळईचे चटके, बीडच्या शिरूर कासारमध्ये सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धाला झालेली मारहाण आणि त्यानंतर एक कोल्हापुरात तरूणानं केलेला आत्मदहनाचा प्रयत्न. ही घटना गुन्हेगारीतून घडलेली नसली, तरी थेट पोलीस ठाण्यातच या व्यक्तिने स्वत:ला पेटवून घेतलं.
हे ही वाचा >> Pune: काकूसोबत अनैतिक संबंध, पण अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा अँगल का आला मधे?
कोल्हापूरमधील इचलकरंजी जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. शेखर गायकवाड नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तो 60 टक्के भाजला.शेखर गायकवाड यांची पत्नी घटस्फोट न घेता पुन्हा लग्न करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती, त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. पत्नी आणि शे्खर गायकवाड यांच्या कुटुंबात भांडण झालं.त्याचमुळे हे दाम्पत्य पोलीस स्टेनशनमध्ये पोहोचलं होतं.
शेखर गायकवाड ही माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. यावेळी तो पोलिसांशी बोलत होता आणि न्यायाची याचना करत होता. शेखर गायकवाड यांनी हे पाहिलं तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आगीचा भडका झाला आणि आगीच्या धगीमुळे शेखर पळत सुटले. या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हे पाहून सगळेच हादरले होते.
हे ही वाचा >> Jaykumar Gore यांच्यावर आरोप करणारी महिला समोर, काय घडलं होतं सगळं सांगितलं, इशाराही दिला...
दरम्यान, पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर शेखर गायकवाड हे 60 टक्के भाजले होते.त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील करंबळ येथील रहिवासी शेखर गायकवाड यांचे सासरचे घर इचलकरंजीमध्ये आहे.