Appasaheb Dharmadhikari: ‘त्या’ दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत मोठा निर्णय
Shree Samarth Baithak: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने 14 श्री सदस्यांना प्राण गमवावे लागले होते. ज्यानंतर आता धर्माधिकारींकडून बैठकींच्या वेळेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Shree Samarth Baithak: मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) हा राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जिथे 20 लाखांहून अधिक श्री सदस्य हे जमा झाले होते. ज्यापैकी 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनावर टीका केली गेली होती. यानंतर संपूर्ण बैठक आणि धर्माधिकारी कुटुंबीयांबाबत चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी बैठक परिवारावर देखील टीका केली होती. मात्र, आता याच चुकीमधून धर्माधिकारी प्रतिष्ठानने धडा घेतला आहे. तसंच बैठकीबाबत एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. (after tragedy in maharashtra bhushan ceremony appasaheb dharmadhikari took big decision time of samarth baithak changed)
ADVERTISEMENT
श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस बैठक होते. जी साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी 7.30 नंतर भरते. मात्र, महिलांची बैठक ही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरवली जाते. अनेक ठिकाणी बैठक ही सकाळी 10.30 आणि दुपारी 1.30 वाजता असते. पण आता याचबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास हा अनेकांना जाणवू शकतो. अशावेळी आधीच एका कार्यक्रमात उष्माघाताने झालेल्या अप्रिय घटनेची जाणीव ठेवून बैठकीची वेळ ही पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचलं का?
त्यानुसार, महिलांच्या दुपारच्या बैठका या रद्द करण्यात आल्या असून आता फक्त सकाळी 7.50 ते 10 वाजेपर्यंतच या बैठका असणार आहेत.
समर्थ बैठकीच्या वेळ बदलण्याबाबतचा नेमका मेसेज
श्री सद्गुरू आज्ञेने श्री समर्थ महिला बैठक वेळेबाबत सूचना
ADVERTISEMENT
वातावरणातील तापमान वाढीमुळे महाराष्ट्रातील सर्व श्री समर्थ महिला बैठक बुधवार दि. 31.05.2023 पासून बैठकीची वेळ बदलली आहे.
ADVERTISEMENT
येत्या बुधवार पासून सर्व महिला बैठकांची वेळ ही सकाळी 7.50 ते 10 वाजेपर्यंत असेल.
सकाळी 7.50 ते 8.00 : श्री मनाचे श्लोक
सकाळी 8.00 ते 8.45 : श्री मंगलाचरण
सकाळी 8. 45 ते 10.00 : श्री वर्तमान समास
आता हा निर्णय कायमस्वरुपी असणार आहे की तात्पुरत्या स्वरुपात याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, एका घटनेतून धडा घेऊन समर्थ बैठकीच्या वेळेबाबतचा हा निर्णय आप्पासाहेब धर्माधिकारींनी घेतल्याने अनेक श्री सदस्य महिलांना दिलासा मिळणार आहे.
श्री समर्थ बैठक म्हणजे काय?
नानासाहेब धर्माधिकारी आणि सुरुवातीच्या काळात आपल्या ओघवत्या वाणीने निरुपणाला सुरुवात करत बैठकीची स्थापना केली होती. यावेळी नानासाहेबांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित, व्यसनाच्या आहारी गेलेल्या आणि अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या लोकांना आपल्या निरुपणाच्या माध्यमातून समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> आप्पासाहेबांच्या घराण्याला ‘धर्माधिकारी’ आडनाव नेमकं कोणी दिलेलं… ‘शांडिल्य’ आडनाव कसं बदललं?
हळूहळू याची व्याप्ती प्रचंड वाढत गेली. त्यानंतर राज्यभरात तालुका-तालुक्यात बैठक स्थापना झाली. त्यानंतर देशभरात आणि परदेशात देखील समर्थ बैठकींना सुरुवात झाली.
बैठकीत नेमकं कशावर होतं निरुपण?
समर्थ बैठकीत दिलं जाणारं निरुपण हे प्रामुख्याने समर्थ रामदासरचित दासबोधावर असतं. यामधील प्रत्येक समासावर आठवड्यातील एक दिवस निरुपण केलं जातं. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या बैठक असतात. तर लहान मुलांसाठी बालभक्ती बैठकही असते.
काम-क्रोध अशा सात विषय-विकारांवर प्रामुख्याने निरुपण केलं जातं. प्रत्येकाने मनातील विषय-विकारांचा त्याग करून निर्मळपणे वागावं असं या निरुपणांमधून सांगितलं जातं. अनेक श्री सदस्यांचा असा दावा आहे की, जेव्हा पासून ते बैठकीला जाऊ लागले आहेत तेव्हापासून ते व्यसनांपासून मुक्त झाले आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस बैठकीच्या श्री सदस्यांची संख्या ही वाढतच चालली आहे.
हे ही वाचा >> नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का.. तेही आप्पासाहेबांच्याच घरातील?
आप्पासाहेब देखील निरुपणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, स्त्रीसन्मान, हुंडाप्रथा याबाबत प्रबोधन करतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूरसारख्या देशात त्यांच्या बैठका होतात. महाराष्ट्रातील खेडोपाड्यांसह आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या पाड्यांवर बैठकांसह विविध कार्यक्रमांचं विशेष आयोजन केलं जातं. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या विविध स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीरांच्या कार्यक्रमांचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT