नामांतरावरून असाही गोंधळ! एकाच दिवशी अहमदनगरला मिळाली चार नवी नावं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ahmednagar name change updates : Eknath shinde devendra fadnavis announced renaming of ahmednagar as ahilya deve holkar nagar.
Ahmednagar name change updates : Eknath shinde devendra fadnavis announced renaming of ahmednagar as ahilya deve holkar nagar.
social share
google news

Ahmednagar Name Change News in Marathi : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतराची (ahmednagar new name) घोषणा केली. पण या घोषणेनं नवा संभ्रम निर्माण झालाय. अहमदनगरचं नाव तर बदलणार मात्र ते बदलून नेमकं काय होणार? असा हा संभ्रम आहे. कारण एकाच दिवशी काही तासांतच अहमदनगरला चार नवनवी नावं देण्यात आलीत. नेमका गोंधळ कसा उडाला आणि एकाच दिवशी चार कोणती नावं अहमदनगरला मिळाली, तेच समजून घ्या. (ahmednagar name change news)

ADVERTISEMENT

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी साजरी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी इथे शासकीय कार्यक्रम झाला. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नाव बदलण्याची घोषणा केली.

गोपीचंद पडळकरांची मागणी

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरासाठी अनेक वर्षांचा संघर्ष झाला. पण, अहमदनगरच्या नामांतराची घोषणा कोणत्याही संघर्षाशिवाय पार पडली. घोषणा झाली, मात्र सरकारने नवा गोंधळही निर्माण केलाय. त्याचं झालं, असं की भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतराची मागणी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अहमदनगर नामांतराची घोषणा करताना काय गोंधळ झाला?

पडळकरांनी हाच मुद्दा जयंती समारंभातही लावून धरला. हाच धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात याच नावाचा उल्लेख केला. फडणवीसांनी मागणी करताना अहिल्यानगर असा उल्लेख केला, पण ट्विटमध्ये पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नामकरण होणार लिहिलं. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी याच कार्यक्रमात नामांतराची घोषणा केली.

Video >> श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची मोर्चेबांधणी, खंदा कार्यकर्ता मैदानात

अहमदनगरचं नाव बदलून ते अहिल्यादेवी होळकर असं करणार असल्याचं शिंदे म्हणाले. तर ट्विटमध्ये अहिल्यादेवीनगर असा उल्लेख केला. म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच घोषणा आणि ट्विटमध्ये अहमदनगरचं वेगवेगळं नामांतर केलं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘सत्य समोर यायला हवे’, भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी मोदी सरकारला सुनावलं

त्यामुळेच एकाच दिवशी अहमदनगरला अहिल्यानगर, पुण्यश्लोक अहिल्यानगर, अहिल्यादेवी होळकर, अहिल्यादेवीनगर अशी चार नावं मिळाली. नामांतराबद्दल सरकारी पातळीवरच मोठा गोंधळ, संभ्रम असल्याचं समोर आलं. आता नेमकं कोणतं नाव दिलं जाणार हे सरकारी आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT