बावनकुळेंची भेट घेऊन परतताना झाला अपघात, अजित पवारांच्या नेत्याचा जागीच मृत्यू

मुंबई तक

अकोल्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांचं अपघातात दुर्दैवी निधन झालं.

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
अजित पवारांच्या नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
social share
google news

धनंजय साबळे, अकोला: अकोला जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झालं आहे. अकोलालगतच्या शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर ट्रकने दिलेल्या धडकेत बिरकड यांच्या जागीत मृत्यू झाला आहे. 

अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळावरून भेटून घरी येत असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. तुकाराम बिरकड हे 2004 ते 2009 या काळात मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षही होते.

हे ही वाचा>> Mumbai Central Railway : लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, मोठा आवाज झाल्यानं हादरले प्रवासी

विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होते. दरम्यान, आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर हे अकोला जिल्हा परिषदेत सभापती देखील होते. राजकारणासह शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात तुकाराम बिरकड यांचं मोठं काम होतं.

हे ही वाचा>> Nagpur Car Accident : नागपूरमध्ये भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन भाऊ आणि एका मित्राचा जागीच अंत...

भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद

दरम्यान, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे. दुपारी सव्वाचारच्या सुमारास अकोला विमानतळाजवळच्या शिवर आणि शिवनी गावाच्या पेट्रोल पंपाजवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बिरकड यांचा मृत्यू झाला. बिरकड यांच्यासोबत दुचाकीवर त्यांचा मित्र राजदत्त मानकर हे होते. त्यांचेही या अपघाताता दुर्दैवी निधन झालं. तुकाराम बिडकर यांच्या पार्थिवावर अकोलालगतच्या कुंभारी अंत्यसंस्कार गावात करण्यात येणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp