"आणखी 15 मिनिट थांबलो असतो तर...", नांदेंडचं जोडपं काश्मीरमधून काय म्हणालं?

मुंबई तक

Kashmir terrorist attack: कृष्णा लोळगे आणि साक्षी 19 एप्रिल रोजी नांदेडहून पहलगामला दौऱ्यावर पोहोचले होते. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला त्याच ठिकाणी ते दोघेही उपस्थित होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाममध्ये अडकलंय नांदेडचं जोडपं

point

घरी फोन करुन काय सांगितलं?

point

15 मिनिटांमुळे कसा वाचला जीव?

Jammu Kashmir : मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानं पूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. त्याच वेळी, महाराष्ट्रातील नांदेडमधील एक जोडपंही तिथे होतं. कृष्णा लोळगे आणि त्यांची पत्नी साक्षी, हल्ल्याच्या काही मिनिटं आधी तिथून निघून गेले आणि थोडक्यात बचावले.

कृष्णा लोळगे आणि साक्षी 19 एप्रिल रोजी नांदेडहून पहलगामला दौऱ्यावर पोहोचले होते. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला त्याच ठिकाणी ते दोघेही उपस्थित होते. हल्ल्याच्या फक्त 15 मिनिटं आधी त्यांनी ते ठिकाण सोडलं होतं. हल्ल्याची बातमी कळताच त्यांनी जवळच्या हॉटेलमध्ये आश्रय घेतला आणि तिथे सुरक्षितपणे राहिले.

हे ही वाचा >> भारताचा पाकिस्ताानला मोठा दणका, 48 तासात 5 मोठे निर्णय, पाकचं कंबरडं मोडणार?

कृष्णाने त्याचा धाकटा भाऊ कुणाल लोळगेला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. कुणालने सांगितल्यानुसार हल्ल्याच्या वेळी कृष्णा आणि साक्षी तिथेच होते. पण स्थानिक लोकांनी त्यांना वेळीच सावध केलं आणि सुरक्षित ठिकाणी पाठवलं. फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान, कृष्णा म्हणाला की, जर आपण तिथे आणखी 15 मिनिटं थांबलो असतो, तर कदाचित आपण आज या जगात नसतो.

ही घटना कळताच नांदेडमधील लोळगे कुटुंबात भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं. कृष्णा आणि साक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कुटुंबीयांनी पाहिला आणि सर्वांचे डोळे भरून आले. व्हिडिओमध्ये दोघेही हल्ल्याबद्दल बोलत आहेत आणि ते सुरक्षित असल्याचे सांगत आहेत.

हे ही वाचा >> 'आमच्या समोर 5 जणांना गोळ्या घातल्या, आम्ही घाबरून अजान म्हटली...', पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार

कृष्णा आणि साक्षी अजूनही पहलगाममध्ये अडकले आहेत. भाऊ कुणाल म्हणाला की विमानाची तिकिटे उपलब्ध होताच, दोघेही नांदेडला परत येतील. केंद्र आणि राज्य सरकार चालवत असलेल्या मदत कार्यांतर्गत त्यांना परतण्यासाठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

या घटनेच्या काही काळापूर्वी काढलेला एक फोटोही समोर आला आहे. यामध्ये कृष्णा आणि साक्षी त्याच ठिकाणी उभे असल्याचे दिसत आहे. धाकटा भाऊ कुणाल लोळगे म्हणाला, भावाने त्याला सांगितले की, एका स्थानिकाने त्यांना हल्ल्याची माहिती दिली आणि त्यांना लवकर निघून जाण्यास सांगितलं. आम्ही सगळे खूप घाबरलो आहोत, पण दोघेही सुरक्षित आहेत हे समाधानकारक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp