कामाची बातमी: तुमची Important कागदपत्रं एका क्लिकवर; कुठेही मिळवा ऑनलाईन!
तुम्ही तुमची कागदपत्रे कधीही आणि कुठेही ऑनलाईन स्वरूपात मिळवू शकता. डिजीलॉकरच्या पर्यायामुळे नागरिकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऑनलाईन डॉक्यूमेंट्स कशी साठवता येतात?

डिजीलॉकरमध्ये अकाउंट तयार करण्याची प्रक्रिया

ऑनलाईन डॉक्यूमेंट्स स्टोर करण्याची प्रक्रिया
Digilocker Importance: 'डिजीलॉकर (Digilocker)' हा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे नागरिकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येतात. हा क्लाउड-बेस्ड प्लॅटफॉर्म असून यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मार्कशीटसारखे महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स सुरक्षितरित्या स्टोर करता येतात. तुम्हाला डिजीलॉकरचा वापर कसा करायचा, माहित नाहीये? मग जाणून घ्या, स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.
काय आहे डिजीलॉकर (Digilocker)?
डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड आयटी (MeitY) द्वारे चालवले जाणारे एक डिजिटल वॉलेट आहे. यामध्ये तुम्हाला 1 जीबी पर्यंत क्लाउड स्टोरेज मिळते तसेच यामध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे साठवू शकता, शेअर करू शकता आणि पडताळू देखील शकता.
डिजीलॉकरमध्ये दोन प्रकारची कागदपत्रे जोडता येतात:
Issued Documents: सरकारी संस्थांद्वारे मिळणारी कागदपत्रे. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखी आवश्यक डॉक्यूमेंट्स डिजीलॉकरमध्ये साठवता येतात.
Uploaded Documents: वापरकर्त्यांनी मॅन्युअली अपलोड केलेली कागदपत्रे, जसे की स्कॅन केलेल्या कॉपी किंवा फोटो.
डिजीलॉकरमध्ये अकाउंड कसं बनवावं?
तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी अकाउंट बनवणं अनिवार्य आहे. ही खूपच सोपी प्रक्रिया आहे.
- वेबसाइट किंवा अॅपवर जा:
- अधिकृत वेबसाईटवर (digilocker.gov.in) जा. याव्यतिरिक्त गूगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरमध्ये जाऊन डिजीलॉकर हा अॅप डाउनलोड करू शकता.
- साइन अप करा: होमपेजवरील 'Sign Up' बटणावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा: आपलं पूर्ण नाव (आधार कार्डनुसार), जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर अशी माहिती भरा.
- पिन सेट करा: 6 अंकी सिक्योरिटी पिन सेट करा.
- व्हेरिफिकेशन करा: यानंतर, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी त्यात भरून 'Submit' पर्यायावर क्लिक करा.
- यूजरनेम आणि पासवर्ड: यानंतर एक यूजरनेम आणि पासवर्ड बनवा. आता तुमचं अकाउंट तयार होईल आणि तुमच्या स्क्रिनवर डॅशबोर्ड दिसेल.
Issued Documents कसे अपलोड करावे?
ही कागदपत्रे थेट सरकारी डेटाबेसमधून मिळवली जातात आणि डिजीलॉकरद्वारे पडताळली जातात. हे डॉक्यूमेंट्स मूळ कागदपत्रांसारखेच मानले जातात.
- लॉगिन करा: डिजीलॉकर वेबसाइट किंवा अॅपवर तुमच्या ओळखपत्रांसह लॉग इन करा.
- Issued Documents सेक्शन: डॅशबोर्डवरील 'Issued Documents' टॅबवर जा.
- कागदपत्र निवडा: 'Search Documents' पर्यायावर क्लिक करा आणि कागदपत्र निवडा, जसे की पॅन कार्डसाठी 'PAN Verification Record' निवडा. तुमचे नाव, जन्मतारीख आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करा. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'Driving License' निवडा. तुमचा DL क्रमांक आणि राज्य परिवहन विभाग निवडा. आधार कार्ड थेट UIDAI कडून मिळवता येते.
- व्हेरिफिकेशन: आवश्यक डिटेल्स (जसे की नाव, जन्मतारीख) प्रविष्ट करा. डिजीलॉकर संबंधित सरकारी एजन्सीकडून कागदपत्रे तपासेल.
- सेव्ह करा: दस्तऐवज तुमच्या 'Issued Documents' विभागात व्हेरिफाइड डिजीलॉकर लोगोसह दिसेल.
- (टीप: हे कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही; ते आपोआप मिळवले जातात आणि सरकारी कामासाठी मूळ कागदपत्रे म्हणून वापरले जाऊ शकतात.)
Uploaded Documents अपलोड कसे करावे?
जर तुमच्याकडे सरकारी डेटाबेसमध्ये उपलब्ध नसलेले डॉक्यूमेंट्स असतील तर ते देखील तुम्ही मॅन्यूअली अपलोड करू शकता.
- लॉगिन करा: डिजीलॉकर वेबसाइट किंवा अॅपवर लॉग इन करा.
- Uploaded Documents सेक्शन: डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला असलेल्या 'Uploaded Documents' पर्यायावर क्लिक करा.
- अपलोड बटण: 'Upload' बटणावर म्हणजेच प्लस किंवा वरच्या बाजूस असलेल्या बाणावर क्लिक करा.
- फाइल निवडा: तुमच्या डिव्हाइसमधून डॉक्यूमेंट निवडा. डिजीलॉकर हे PDF, JPEG, PNG फॉर्मेट्सना सपोर्ट करते.
- फाइलची कमाल साइज: 10 एमबी
- डॉक्यूमेंटचा प्रकार निवडा: डॉक्यूमेंट अपलोड केल्यानंतर 'Select Doc Type' पर्यायावर जाऊन तुमच्या डॉक्यूमेंटचा प्रकार निवडा. म्हणजेच, मार्कशीट, सर्टिफिकेट, वीजबिल इ.
- डिस्क्रिप्शन (पर्यायी): तुम्ही दस्तऐवजाबद्दल अगदी कमी शब्दात माहिती लिहू शकता.
- सेव्ह करा: यानंतर'Save' बटणावर क्लिक करा. तुमची कागदपत्रे 'Uploaded Documents' सेक्शनमध्ये दिसतील.
- ई-साइन (पर्यायी): आवश्यक असल्यास, दस्तऐवजावर डिजिटल स्वाक्षरी करण्यासाठी 'ई-साइन' पर्याय वापरा.
- (टीप: अपलोड केलेले कागदपत्रे मूळ मानले जात नाहीत परंतु स्कॅन केलेल्या प्रती स्वीकार्य असतील तर त्यांचा वापर करता येतो.)
- हे ही वाचा: Personal Finance: तुमची मुलं कॉलेजमध्ये जाईपर्यंत तुम्ही व्हाल करोडपती, कामी येईल 'हा' फॉर्म्युला
डिजीलॉकरचे फायदे
- कुठेही, कधीही अॅक्सेस: तुमचे दस्तऐवज कोणत्याही जागी मोबाईल किंवा कंप्यूटरवरून अॅक्सेस करता येतात.
- कागदविरहित (पेपरलेस) प्रशासन: फिजिकल म्हणजेच मूळ कॉपीची कमी गरज भासते, यामुळे वेळ आणि पैसा वाचतो.
- व्हेरिफाइड कागदपत्रे: Issued Documents सरकारी संस्थांद्वारे व्हेरिफाय केले जातात आणि यामुळेच ती विश्वसनीय बनतात.
- कमी खर्च: सरकारी विभागांना कागदपत्रांचा खर्च कमी होतो.
- वापरकर्त्यांसाठी खास टिप्स
- सुरक्षा: डिजीलॉकर 256-बिट SSL एन्क्रिप्शन वापरते यामुळे तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवता येतात. तुमच्या संमतीशिवाय कोणीही तुमचा डेटा अॅक्सेस करू शकत नाही.
- नॉमिनी जोडू शकता: तुम्ही तुमच्या खात्यात एक नॉमिनी व्यक्ती जोडू शकता जी भविष्यात तुमचे दस्तऐवज अॅक्सेस करू शकेल. यासाठी, नॉमिनीचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्यात भरा.
- ऑफलाइन अॅक्सेस: कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही त्यांना ऑफलाइन देखील अॅक्सेस करू शकता.
- अनेक फाइल्स: तुम्ही एकाच वेळी अनेक फाइल्स अपलोड करू शकता.
- कागदपत्रे शेअर करा: अपलोड केलेली कागदपत्रे ईमेल किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे शेअर केले जाऊ शकतात. यासाठी 'Share' पर्यायावर क्लिक करा आणि प्राप्तकर्त्याचा ईमेल टाका.