भ्रष्टाचाराची भली मोठी कीड… 1 कोटीची लाच घेणारा महाराष्ट्रातील हा अधिकारी तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

amit gaikwad assistant engineer of midc in ahmednagar has been arrested by anti corruption bureau for accepting a bribe of rs 1 crore
amit gaikwad assistant engineer of midc in ahmednagar has been arrested by anti corruption bureau for accepting a bribe of rs 1 crore
social share
google news

1 Crore Rs Bribe Ahmednagar: रोहित वाळके/ प्रविण ठाकरे, अहमदनगर: अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सहाय्यक अभियंता अमित गायकवाडला तब्बल 1 कोटी रुपयांची लाच ( Bribe of Rs 1 Crore) घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सायंकाळी रंगेहाथ पकडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (amit gaikwad assistant engineer of midc in ahmednagar has been arrested by anti corruption bureau for accepting a bribe of rs 1 crore)

ADVERTISEMENT

अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC मध्ये ठेकेदाराने 100 mm व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे 2 कोटी 99 लाख रुपये बिल झाले होते. त्यामुळे काम पूर्ण झाल्यावर ठेकेदारने आपल्या या बिलाची मागणी केली होती. तेव्हा मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी अमित गायकवाड याने गणेश वाघ यांच्या संगमताने ठेकेदाराकडे तब्बल एक कोटींच्या लाचेची मागणी केली होती.

हे ही वाचा >> Elvish Yadav: रेव्ह पार्टीमध्ये का नेतात नाग, विषारी साप अन् नशा.. काय आहे कनेक्शन?

एवढी प्रचंड रक्कम लाच मागत असल्याचे पाहून ठेकेदाराने थेट नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. ज्यानंतर सापळा रचून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

हे वाचलं का?

‘माझ्या हिस्स्याचे पैसे ठेव…’

मिळालेल्या माहितीनुसार, 1 कोटी रुपयांची रक्कम शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील
शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार अमित गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला होता. त्याचवेळी त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले.

amit gaikwad assistant engineer of midc in ahmednagar has been arrested by anti corruption bureau for accepting a bribe of rs 1 crore
1 कोटीची लाच प्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी गणेश वाघ

हे ही वाचा >> 23 वर्षाच्या तरुणाने केला 91 वर्षाच्या महिलेशी लग्न, आता करतोय वेगळीच मागणी

याच दरम्यान अमित गायकवाड याने वाघ यांना पैसे भेटल्याचं कळवलं. ज्यानंतर गणेश वाघ यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ADVERTISEMENT

अभियंता अमित गायकवाड यांनी घेतलेली एक कोटी रक्कम ही गणेश वाघ यांची 50% तर गायकवाड यांची 50 टक्के होती. रक्कम भेटल्यानंतर गायकवाड यांनी वाघ यांना रक्कम भेटल्याचे सांगितलं. त्यावर वाघ म्हणाले, ‘माझ्या हिस्स्याचे पैसे ठेव.. मी माणूस पाठवतो त्याकडे ती देऊन ठेव तोपर्यंत ती संभाळून ठेवा.’ ज्यानंतर वाघ यांना देखील अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

दरम्यान, या प्रकरणी नाशिक येथे विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT