Vitthal Mandir: पत्राच्या घरात राहणाऱ्या महिलेने दान केले तब्बल 18 लाखांचे दागिने, कारण…
18 lakhs worth of jewellery, पत्राच्या घरात राहणाऱ्या बाई वाघे यांनी श्रद्धेपोटी विठुरायाच्या चरणी तब्बल 18 लाख रुपयांचे दागिने अर्पण केले आहे. पंढपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात त्यांनी 26 तोळ्याचा करदोडा आणि रुक्मिणी मातेसाठी सोन्याची गंठण अर्पण केली आहे.
ADVERTISEMENT

18 lakhs of Jewelery Donation for Pandharpur Vitthal Mandir: गणेश जाधव, धाराशिव: राहण्यासाठी पत्र्याचे जुनाट, जीर्ण घर ना खाली फरशी, ना विजेची व्यवस्था… रात्री केवळ मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश… अशा स्थितीत राहणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावातील महिला बाई लिंबा वाघे यांनी श्रद्धेपोटी विविध मंदिरांना 50 लाखांपेक्षाही अधिक दान दिले आहे. नुकतेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाला त्यांनी सोन्याचा कडदोरा व रुक्मिणीला गंठण असे तब्बव 18 लाखाचे दागिने नुकतेच अर्पण केले आहेत. आतापर्यंत विविध मंदिरांना त्यांनी तब्बल 50 लाख रुपयांचे दागिने दान केले आहेत. जो आता चर्चेचा विषय बनला आहे.
वृद्ध महिलेकडून आतापर्यंत 50 लाखांचे दान
बाई लिंबा वाघेला याचे वय 85 वर्षे आहे. त्या एकट्याच वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पतीचे 50 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांना अपत्यही नाही. त्यांना वाटणीची 11 एकर शेती आहे. त्यावर त्यांची गुजराण होते. पण नुकतेच बाई वाघे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देवाला सोन्याचा 26 तोळ्याचा करदोडा व रुक्मिणीला सोन्याचे गंठण अर्पण केले आहे. याची बाजारातील किंमत एकूण 18 लाख रुपये आहे. केवळ श्रद्धेपोटी बाई वाघे यांनी विठुरायाच्या चरणी हे दागिने अर्पण केले आहेत. ज्यानंतर मंदिर समितीच्या वतीने बाई वाघे यांचा सत्कारही करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Cyclone: 2 चक्रीवादळं कुठे धडकणार, ‘तेज’ चक्रीवादळ येणार मुंबईच्या दिशेने?
बाई वाघे यांनी यापूर्वी रुईभर (धाराशिव) येथील श्री दत्तमंदिरात कळसासाठी एक तोळे सोने व एक किलो चांदी अर्पण केली होती. तर पळसवाडीतील मारुती मंदिरासाठी सात लाख रुपयांच्या मूर्ती, शिवाजीनगर (धाराशिव) येथील खंडोबा मंदिरात दोन लाख रुपयांच्या मूर्ती, अक्कलकोटच्या मंदिराच्या अन्नछत्रात भांडी दिली आहेत.
तसेच बेंबळीतील खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पंढरपूरला दान देण्यासाठी त्यांच्या मालकीची सहा एकर शेती विकली आहे.
आपल्या घरातील वीजेची जोडणीही बाई वाघे यांनी तोडून टाकली आहे. त्यांचा रात्रीचा वेळ केवळ मिणमिणत्या दिव्याच्या सानिध्यात जातो. त्यांच्या घरात पाण्यासाठी घागर, धान्य ठेवण्यासाठी जुन्या पद्धतीची खापराची भांडी, दोन तीन साड्या असेच साहित्य सोबत असते. वार्धक्य आलेले असतानाही स्वयंपाक व अन्य कामे त्या स्वतःच करतात.
हे ही वाचा>> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story
असं असूनही त्या धार्मिक दान करण्यासाठी जे दातृत्व दाखवत आहेत त्याची फक्त धारशिवच नव्हे अनेक देवस्थानांमध्ये चर्चेचा विषय आहे.