Pune Crime: पुण्यात खळबळ! वाहतूक पोलिसाच्या डोक्यात घातला दगड, भर रस्त्यात नेमकं घडलं तरी काय?

मुंबई तक

Pune Traffic Police Attack Case : पुण्यात गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणाऱ्या पोलिसांवरच हल्ला होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime Latest News Update
Pune Crime Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला

point

फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात घडली खळबळजनक घटना

point

पोलिसावर हल्ला करताच आरोपी झाला फरार

Pune Traffic Police Attack Case : पुण्यात गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणाऱ्या पोलिसांवरच हल्ला होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला झाल्याचं समोर आलंय. राजेश गणपत नाईक (वय ४७) असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा खळबळजनक प्रकार घडला. राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात ही घटना घडली. पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले. त्यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "दिल्लीत प्रचंड मोठा पराभव...", राहुल गांधींवर निशाणा साधत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याचं गेल्या काही दिवसात उघडकीस आलं आहे. पुण्यातील कथित हिट अँड रन प्रकरणानंतर बेकायदेशीरपणे वाहन चालवणाऱ्या चालकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. परंतु, वाहतूक पोलिसांवरच जीवघेणे हल्ले होत असल्याचं समोर आलं असून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा >> 'ऑपरेशन टायगर'ला 'टायगर जिंदा हैं' म्हणत उत्तर... ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र पत्रकार परिषदेत घेत दिली गॅरंटी

हे वाचलं का?

    follow whatsapp