Anjali Damania : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार? महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर पुन्हा सुनावणी
Anjali Damania Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. भुजबळांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया( Anjali Damania)यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ADVERTISEMENT
Anjali Damania Vs Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. या निवडणुकीपुर्वी आता छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. भुजबळांची (Chhagan Bhujbal) निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया( Anjali Damania)यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) अडचणी वाढणार आहेत. (anjali damania chhagan bhujbal maharashtra sadan scam hearing tommorrom high court)
ADVERTISEMENT
खरं तर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांची याआधी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतरही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी हस्तक्षेप केला आहे. आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा : कीर्तिकरांच्या जागेवर शिंदे 'या' अभिनेत्याला उतरवणार मैदानात?
अंजली दमानीया यांची पोस्ट जशीच्या तशी
महाराष्ट्र सदन घोटाळा :
हे वाचलं का?
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिस्चार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे याचिका गेली दिड वर्ष ऐकली जात नव्हती. ५ न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करुन त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ ह्यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक 12 वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी...", मोदींनी कुणाला दिला इशारा?
नेमका आरोप काय?
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जारी करण्यात आलेल्या विविध कत्राटामधून भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांना रोखरक्कम लाचेच्या स्वरूपात मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसूली संचालनालयाने भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT