Viral News : ''आप्पाचा विषय लय हार्ड ए, आप्पाकडे मागितला OTP पण...'', मुंबई पोलिसांची हटके जनजागृती

मुंबई तक

ADVERTISEMENT

 appa cha vishay lay hard hai song mumbai poice use this lyrics to spread awareness about cyber safety
मुंबई पोलिसांची हटके जनजागृती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आप्पाच्या गाण्यावरून मुंबई पोलिसांची हटके जनजागृती

point

ट्रेंडमध्ये आता मुंबई पोलिसांनी उडी घेतली

point

सायबर चोरीला आळा बसवण्यासाठी जनजागृती

Appa Cha Vishay Lay Hard Hai :  सोशल मीडियावर सध्या  ''आप्पाचा विषय लय हार्ड ए'' हे गाण खूपच चर्चेत आहे. ज्याच्या त्याच्या  तोंडावर हेच गाण ऐकू येत आहे. इंस्टाग्रामवर सूद्धा याच गाण्याचा ट्रेंड सूरू आहे. या गाण्यावरून विविध प्रकारची रिल्स बनवली जात आहे. याच ट्रेंडमध्ये आता मुंबई पोलिसांनी उडी घेतली आणि आप्पाचा विषय लय हार्ड केला आहे. या गाण्याच्या माध्यमातून आता मुंबई पोलिसांनी जनजागृती केली आहे. मुंबई पोलिसांची ही जनजागृती नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे.  (appa cha vishay lay hard hai song mumbai poice use this lyrics to spread awareness about cyber) safety 
 
 ''आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचे बाहेर लय लाड आहे'', असे त्या गाण्याचे शब्द आहेत. मुंबई पोलिसांनी याच गाण्याला घेऊन जनजागृती केली आहे. ''आप्पाचा विषय लय हार्ड ए , आप्पांकडे क्रेडिटचं कार्ड ए..आप्पांकडे मागितला OTP पण, आप्पांना सायबर सेफ्टीचं ज्ञान ए..''अशी पोस्ट मुंबई पोलिसांनी केली आहे.

हे ही वाचा : Cm Vayoshri Yojana : 'लाडक्या बहिणी'नंतर कुणाला मिळणार 3000 रूपये?

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)


 
एकूणच आप्पाच्या विषयाला घेऊन मुंबई पोलिसांनी नागरीकांमध्ये सायबर चोरीबाबत मोठी जनजागृती केली आहे. हल्ली कुणाच्या मोबाईलवरून ओटीपी मागवून त्याचं बँक खाते रिकामे करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरीकांमध्ये हटके जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आप्पाचा विषय हाती घेतला आहे. जेणेकरून नागरीक कुणाला ओटीपी शेअर न करता सायबर चोरीपासून बचावतील. 

मुंबई पोलिसांची ही जनजागृती नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. मुंबई पोलिसांनी इस्टाग्रामवर केलेला पोस्टवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या पोस्टवरून आता मुंबई पोलिसांच्या क्रिएटीव्हीची दाद दिली जात आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय, तरी 4500 खात्यात डिपॉझिट होणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT