Minimum Amount Due in Credit Card: क्रेडिट कार्डच्या 'MAD' पेमेंटपासून सावधान! नाहीतर, खिशाला लागेल कात्री
बऱ्याचजणांना क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू अमाउंट' पे करणे हा सोपा पर्याय वाटतो. मात्र, वारंवार याचा वापर केल्यास आर्थिक बाबींवर वाईट परिणाम होऊ शकतो. बँका क्रेडिट कार्डवर MAD (मिनिमम अमाउंट ड्यू) असा पर्याय का देतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मिनिमम अमाउंट ड्यू (MAD) म्हणजे काय?

मिनिमम अमाउंट ड्यू (MAD) चा आर्थिक बाबींवर काय परिणाम होतो?

वारंवार MAD पेमेंटचे नुकसान काय आहेत?
Credit Card News: आपल्यापैकी अनेकांना क्रेडिट कार्डचा वापर करणे सोयीस्कर वाटते. क्रेडिट कार्डच्या वापरकर्त्यांसाठी बिल जनरेट झाल्यानंतर नेहमी दोन पर्याय असतात. एक 'रक्कम पे करणे' आणि दोन 'मिनिमम ड्यू अमाउंट' पे करणे. मिनिमम ड्यू अमाउंट ही 15 टक्के ते 25 टक्के पर्यंत असते. क्रेडिट कार्डचा नियमित वापर करणाऱ्यांना वाटते की त्यांना फक्त २५ टक्के रक्कम भरण्याची संधी मिळत आहे. अशा परिस्थितीत ते याचा फायदा घेतात. मात्र, प्रत्येक वेळी या संधीचा फायदा घेणे तुमच्यासाठी महागात पडू शकते.
मुंबईत राहणारे हर्ष सुद्धा अनेकदा अशीच चूक करतात. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या हर्ष यांनी 1 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड घेतले. हर्ष त्यांचा CIBIL (सिबिल) स्कोर वाढवण्यासाठी या कार्डचा जास्त वापर करत नाहीत. ते यावर दर महिन्याला फक्त 15000 ते 16000 रुपये खर्च करतात. जेव्हा हर्षचे बिल तयार होते, तेव्हा ते या बिलाची 4000 रुपये मिनिमम अमाउंट ड्यू भरतात.
मिनिमम अमाउंट ड्यू (MAD) म्हणजे काय?
क्रेडिट कार्डचे 'मिनिमम अमाउंट ड्यू (MAD)' भरणे हा अनेक लोकांसाठी सोपा पर्याय असल्याचे दिसून येते, परंतु ही सुविधा तुमच्या आर्थिक बाबींवर परिणाम करू शकते. बँका क्रेडिट कार्डवर MAD (मिनिमम अमाउंट ड्यू) असा पर्याय का देतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हे ही वाचा: UPSC Archit Dongre: मराठमोळा अर्चित डोंगरेने UPSC साठी IT कंपनीतील नोकरी सोडली, अन् देशात आला तिसरा!
बँकांना त्यांच्या क्रेडिट कार्डधारक ग्राहकांना पूर्ण बिल पेमेंटसह मिनिमम अमाउंट ड्यू म्हणजेच किमान देय रकमेचा पर्याय द्यावा लागतो. जर त्या महिन्यात ग्राहकाकडे पैशांची कमतरता असेल तर तो MAD तो भरून लेट फी टाळू शकतो. उशिरा पैसे देण्याऐवजी MAD भरणे कधीही चांगले असल्याचं सांगितलं जातं आणि तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर खराब होण्यापासून वाचवू शकता.
वारंवार MAD पेमेंटचे नुकसान काय आहेत?
जर तुम्ही वारंवार MAD रक्कम भरत असाल तर तुमच्या खिशावर वाईट परिणाम तर होतोच पण त्यासोबत तुमच्या सिबिल स्कोर खराब होण्याचा धोका असतो. जरी बँका MAD वर उशिरा पेमेंट घेत नसल्या तरी, उर्वरित रकमेवर ते जास्त व्याज आकारतात. यामुळे ती रक्कम वाढतच जाते. वारंवार MAD भरल्याने CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. बऱ्याचदा बँका उर्वरित रकमेवर वार्षिक 36 टक्के ते 42 टक्के दराने व्याज आकारू शकतात.
हे ही वाचा: Vastu Tips: बेडरूममध्ये कोणत्या रंगाचा Bulb लावावा?
अशा परिस्थितीत काय करावे?
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे अनुशासन खूप महत्वाचं आहे. तुम्ही बिल वेळेवर भरले पाहिजे. तुमचा क्रेडिट कार्डवरील खर्च नियंत्रणात वारंवार MAD भरणे टाळा. जर अशी परिस्थिती उद्भवली तर तर अशी पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घ्या.