Bharat Bandh : उद्या 'भारत बंद', नेमकं घडलंय तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bharat band on 21st august 2024 nationwide protest what is closed everything you need to know about read full article bharat band 202
उद्या 21 ऑगस्टला 'भारत बंद'ची घोषणा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

21 ऑगस्टला भारत बंदची घोषणा

point

भारत बंद दरम्यान कोणत्या गोष्टी बंद राहणार?

point

भारत बंद दरम्यान कोणत्या गोष्टी सूरू राहणार?

Bharat Bandh 2024 : एससी आणि एसटी आरक्षणाबाबत क्रिमी लेयर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या 21 ऑगस्टला भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. आरक्षण बचाव संघर्ष समिती आणि विविध दलित संघटनांनी भारत बंदची ही हाक दिली आहे.  या बंद दरम्यान कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यास आला आहे. दरम्यान या भारत बंदची नेमकी का हाक देण्यात आली आहे. आणि या बंद दरम्यान काय काय राहणार आहे? आणि काय बंद असणार आहे? हे जाणून घेऊयात. (bharat band on 21st august 2024 nationwide protest what is closed everything you need to know about read full article bharat band 2024) 

ADVERTISEMENT

बंद दरम्यान हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश विशेषत: संवेदनशील मानला जातो, त्यामुळे तेथील पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. निदर्शने दरम्यान सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी व्यापक उपाययोजना करत आहेत.

काय बंद राहणार? 

भारत बंदबाबत अद्याप कोणत्याही राज्य सरकारने अधिकृतपणे मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली नाहीत. भारत बंददरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी खासगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

काय राहणार सुरू? 

भारत बंद दरम्यान रुग्णालये आणि रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. बँक कार्यालये व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे बुधवारी बँका आणि सरकारी कार्यालये सुरू राहणार असल्याचे मानले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिलेला? 

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना एससी - एसटी आरक्षणात क्रिमी लेयर बनवण्याची परवानगी दिली आहे. ज्याला खरंच त्याची गरज आहे, त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी. त्यासाठी सब-कॅटेगरी बनवण्याचं कोर्टाने सांगितलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. त्याच विरोधात संघटनांनी हा निर्णय न्यायालयाने मागे घेण्याच्या मागणीसाठी उद्या मंगळवारी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT