LPG Price: बजेटनंतर गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या किती रूपयांनी वाढली किंमत?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसचे रेट जाहीर केले आहेत.

point

अर्थसंकल्पानंतर (Budget 2024) एलपीजी सिलिंडरचे आता पुन्हा एकदा दर वाढले आहेत.

point

आज 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत हे बदल करण्यात आले आहे.

LPG Gas Price 1 August : नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसचे रेट जाहीर केले आहेत. अर्थसंकल्पानंतर (Budget 2024) एलपीजी सिलिंडरचे आता पुन्हा एकदा दर वाढले आहेत. आज 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत हे बदल करण्यात आले आहेत. ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ फक्त 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरमध्ये झाली आहे. तर 14  किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. (big change in gas cylinder prices today on 1st august after budget 2024 Know how many rupees increased in the LPG Price)

ADVERTISEMENT

IOCL वेबसाइटनुसार, मुंबई ते दिल्ली व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे आता नागरिकांच्या खिशावर याचा परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार? वाचा IMD चा नवा इशारा

मुंबईसह इतर शहरांमध्ये बदल काय?

आज 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडर दिल्लीत 6.50 रुपयांनी, मुंबईत 7 रुपयांनी, कोलकात्यात 8.50 रुपयांनी आणि पाटणामध्ये 8 रुपयांनी महागला आहे. ही वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

  • मुंबईत या सिलिंडरची किंमत यापूर्वी 1597 रूपये होती पण आजपासून 7 रूपयांनी वाढून ही किंमत 1605 रूपये झाली आहे. 

  • दिल्लीत कमर्शियल सिलिंडरची किंमत यापूर्वी 1646 रूपये होती पण आजपासून 6.50 रूपयांनी वाढून ही किंमत 1652.50 रूपये झाली आहे. 
  • चेन्नईमध्येही एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली आहे. आजपासून येथे1809.50 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता 1817 रुपयांना मिळत आहे.
  • कोलकात्यामध्ये गॅस सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे. यापूर्वी 1756 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 1764.50 रुपयांना मिळणार आहे. 
  • हेही वाचा : शिंदे सरकारची आणखी एक योजना, आता मुलींना नेमकं काय मिळणार मोफत?

    घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत कोणता बदल?

    घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतही बदल करण्यात आलेला नाही. 9 मार्च 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत शेवटचा बदल करण्यात आला. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती. मुंबईत 802.50 रुपयांना तर, दिल्लीमध्ये 803 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहे.

    ADVERTISEMENT

    हेही वाचा : मैत्रिणीला मुलगा बनून पाठवली 'फ्रेण्ड रिक्वेस्ट, प्रेमात पडली तरुणी अन् नंतर घेतला गळफास

     
    7 मार्चला मोदी सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळानं 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जवळपास 5 महिन्यांपासून 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT