Brazil plane crash video : गिरक्या घेत कोसळले विमान अन् 62 जणांचा गेला जीव; व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

ब्राझीलमध्ये प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले असून, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ब्राझीलमध्ये एक प्रवासी विमान कोसळले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ब्राझीलमध्ये भयंकर विमान अपघात

point

ब्राझीलमधील विमान अपघाताचा व्हिडीओ

point

विमानातील ६२ प्रवासी जागीच ठार

Brazil plane crash today : ब्राझीलमध्ये एक थरकाप उडवणारा विमान अपघात घडला आहे. स्थानिक टीव्ही स्टेशन ग्लोबो न्यूजच्या वृत्तानुसार, शुक्रवारी (9 ऑगस्ट) ६२ जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या साओ पाउलोजवळ ६२ जणांना घेऊन जाणारे एक प्रादेशिक टर्बोप्रॉप विमान क्रॅश झाले, ज्यात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला, असे अपघातस्थळाजवळील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

विन्हेडोजवळील व्हॅलिन्होस शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात कोणीही वाचलेले नाही. स्थानिक कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्समधील घराचे नुकसान झाले आहे. मात्र, घरातील कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

उड्डाण केल्यानंतर गिरक्या घेत आले खाली

एटीआर-७२ हे विमान, एअरलाइन वोपस लिन्हास एरियास कंपनीचे होते. पराना राज्यातील कास्केव्हेलवरून ते साओ पाउलो येथील ग्वारुलहोसकडे जात होते. साओ पाउलोच्या राज्य अग्निशमन दलाने सोशल मीडियावर दुजोरा दिला की विन्हेडोमध्ये विमान क्रॅश झाले आणि सात कर्मचारी क्रॅश भागात पाठवण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजितदादांचा पॅटर्नच वेगळा, आता गुलाबी जॅकेट नाही तर थेट...

विमानात होते 58 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स 

एअरलाइन वोपासने एका निवेदनात सांगितले की,साओ पाउलोच्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणारे विमान क्रॅश झाले. त्यात 58 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. अपघात कशामुळे झाला हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही.

हेही वाचा >> "सुपाऱ्या फेकणारे 100 टक्के शिवसैनिक असतील, पण...", राऊतांचा खुलासा

ब्राझिलियन टेलिव्हिजन नेटवर्क ग्लोबोन्यूजने निवासी भागात आग लागल्याचे आणि विमानाच्या काही भागातून धूर निघत असल्याचे फुटेज दाखवले. ग्लोबोन्यूजवरील फुटेजमध्ये विमान वेगाने खाली पडत असल्याचे दिसून आले. व्हिडीओमध्ये विमान झाडे असलेल्या भागात पडताना दिसत आहे. यानंतर धुराचे लोट उठतात. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT