Chandra Grahan 2023: चंद्र ग्रहणाचा सुतक काळ सुरु, पुढचे 9 तास अजिबात करू नका ‘या’ चुका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

chandra grahan 2023 sutak kaal timing in india treaming of lunar eclipse 2023
chandra grahan 2023 sutak kaal timing in india treaming of lunar eclipse 2023
social share
google news

Chandra Grahan 2023 : या वर्षातील शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर शेवटचे चंद्रग्रहण आजपासून म्हणजेच शनिवार 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता होणार आहे. आज होणारे हे ग्रहण पूर्ण नसून आंशिक असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह (India) जगातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. संध्याकाळी 4.05 पासून चंद्रग्रहणाचा सुतक (Sutak) कालावधी सुरू झाला आहे. या प्रकारच्या चंद्रग्रहणाच्या काळात अनेक गोष्टी करणे वाईट मानल्या जातात. (chandra grahan 2023 sutak kaal timing in india treaming of lunar eclipse 2023)

ADVERTISEMENT

ग्रहण काळात पूजा नाही

चंद्रग्रहणाचा कार्यकाळ हा अशुभ काळ मानला जात असतो. त्यामुळे सुतकापूर्वी आणि या प्रकारच्या ग्रहणकाळात अनेक गोष्टींवर बंधनं येत असतात. या ग्रहणाचा काळ म्हणजे मंदिरांचे दरवाजेही बंद केले जातात, कारण ग्रहणकाळात पूजाही केली जात नाही. या ग्रहण काळात एखाद्याला पाठ-पूजा करायची असेल तर ग्रहण काळात कोणत्याही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये असा सल्लाही दिला जातो. मात्र या ग्रहण काळात तुम्ही देवी-देवतांच्या मंत्रांचाही जप करू शकता.

LIVE Update :

04:25 pm: हा चंद्रग्रहण काळ अशुभ मानला जातो. म्हणून लोकांना सुतक सुरू झाल्यानंतर घरी जाण्याचाही सल्ला दिला जातो. ग्रहण काळात तुम्ही काही कारणास्तव घराबाहेर असाल तर चुकूनही चंद्राकडे पाहू नये असंही सांगितले जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

04.20 pm: आज जे ग्रहण होणार आहे त्याला आंशिक आणि खंडग्रास चंद्रग्रहण असंही म्हणतात. जेव्हा पृथ्वीची सावली पूर्ण पडत नाही परंतु काही भागांवर पडते तेव्हा त्याला आंशिक चंद्रग्रहण असं म्हटलं जाते.

हे ही वाचा >>Crime : भयंकर…एकाच कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या

04:15 pm: चंद्रग्रहण काळातील सुतक काळामध्ये गर्भवती महिलांनी पोटावर गेरू लावल्यास ग्रहणाच्या नकारात्मक शक्तींपासून त्यांचे संरक्षण होते. सुतक काळात खाणे टाळावे असंही ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते.

ADVERTISEMENT

04:10 pm: चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधीपासूनच सुरू होतो. जेव्हा ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होतो, त्याकाळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये असं सांगितले जाते. सुतक काळात गर्भवती महिलांनी अन्नही शिजवू नये. त्याबरोबरच गरोदर महिलांनी चाकू, कात्री, सुई या कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर करू नये असंही सांगण्यात येते.

ADVERTISEMENT

04:05 pm: चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी हा 4.05 पासून सुरू झाला आहे. त्यामुळे सुतक काळात अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असते.

हे ही वाचा >> विधवा सुनेवर सासऱ्याची वाईट नजर, लग्नाला विरोध करताच घडली भयंकर घटना

    follow whatsapp

    ADVERTISEMENT