Chandrayaan-3: भारताचं ‘प्रज्ञान’ जगाला चंद्राचं ‘ज्ञान’ देणार…; नेमकं काय-काय मिळणार?
Chandrayaan-3 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्त्रोनुसार, लँडर आणि रोव्हरमध्ये पाच वैज्ञानिक पेलोड आहेत, जे लँडर मॉड्यूलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
Chandrayaan-3 Rover Pragyan in Action : ज्या मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. त्या चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भूपृष्ठवर दाखल होताच जगात पुन्हा एकदा भारत अव्वल ठरला आहे. त्यामुळे भारताकडूनच आता जगाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नेमकं काय चाललं आहे ते कळणार आहे. त्याच बरोबर साऱ्या जगाला भारत आता पृथ्वीच्या निर्मितीपासून ते सूर्यमालेमध्ये घडणाऱ्या विविध घटना दक्षिण ध्रुवाच्या माध्यमातून सांगणार आहे. भारतातीला 140 कोटी जनतेच्या आशा अपेक्षेबरोबरच 40 दिवसाआधी म्हणजेच 14 जुलै पासून चांद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर 41 व्या दिवसांपासून चांद्रयानकडून घडामोडींचे वृत्त येऊन लागले. चांद्रयान 3 मुळे आता प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन आला.
ADVERTISEMENT
चंद्रावरची सर…
चांद्रयान 3 यशस्वी लॅडिंग झाल्यानंतर आता प्रज्ञान रोवरने आपले काम सुरु केले आहे. प्रज्ञान रोवरने फोटो घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दक्षिण ध्रुवावरील पहिला प्रतिमा आता जगासमोर भारतानेच आणली आहे. इस्त्रोकडून गुरुवारी सकाळी गुड न्यूज ते प्रज्ञान रोवर आता चंद्रावर उतरुन सर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस प्रज्ञान रोवरकडून चंद्राच्या बाबतील आता माहिती देण्यास सुरुवात होणार आहे.
वाचा : Chandrayaan 3 Update : विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर काय करणार?
देशाला प्रतिक्षा लागली…
चंद्रावरील प्रतिमा या लँडर इमेजर कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतले गेले आहेत. त्यामध्ये चांद्रयान 3 चे लॅडिंगच्या बाजूचा एक भाग, त्याच बरोबर चांद्रयान 3 च्या दुसऱ्या बाजूही दिसत आहे. तसेच तेथील मिळणाऱ्या फोटोमधून ज्या ठिकाणी चांद्रयान ज्या ठिकाणी उतरले आहे, ते ठिकाण सपाट आहे. त्यामुळे इस्त्रोकडून असं स्पष्ट करण्यात आले की, लँडर आणि अंतराळातील मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) यांच्यामध्ये एककम्युनिकेशन लिंक निर्माण केली आहे. सुरक्षित टचडाउन सुनिश्चित करण्यासाठी, लँडरमध्ये एक्सीलरोमीटर, अल्टिमीटर, डॉप्लर वेगमापक, टचडाउन सेन्सर व इतर धोका टाळण्यासाठी आणि तेथील माहिती मिळवण्यासाठी कॅमेऱ्यांसह अनेक सेन्सर्स त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. आता प्रज्ञान रोव्हर चंद्राविषयी ठोस माहिती कधी देणार या गोष्टीचीही देशाला प्रतिक्षा लागून राहिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
देशाचा तिरंगा चंद्रावर
रोव्हर ‘प्रज्ञान’ हे 6 चाकी रोबोटिक व्हिईकल आहे, तेच चंद्रावर फिरुन छायाचित्र काढणार आहे. त्याच प्रज्ञानमध्ये इस्रोचा लोगो आणि देशाच तिरंगा बनवण्यात आला आहे. शास्त्रज्ञ रोव्हरद्वारे चंद्रावरून पाठवण्यात येणारा डेटा पाहण्याचा आणि त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार केला जाणार आहे. चंद्रावर उतरल्यानंतर 4 तासांनी ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरमधून बाहेर आले. रोव्हर ‘प्रज्ञान’ हे चंद्रावर एक सेंटीमीटर प्रति सेकंद वेगाने फिरणार असल्याचेही शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या ठिकाणी कॅमेऱ्यांच्या मदतीने चंद्रावरील गोष्टी स्कॅन करून माहिती मिळवणार आहे. प्रज्ञानकडून हवामानाचीही माहिती पेलोडच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. जे चंद्राच्या पृष्ठभागाविषयी अधिक चांगली माहिती देऊ शकतील.
वाचा : Chandrayaan-3 : चंद्रावर यान उतरताच शरद पवारांचा मोदींना टोला, म्हणाले…
इत्थंभूत बातमी देणार
चांद्रयान 3 हे चंद्रावर 14 दिवस राहून काम करणार आहे. त्यामुळे चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यामुळे तो पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की प्रज्ञान आणि विक्रम अतिरिक्त चंद्र दिवसासाठी काम करू शकतात. तेथे त्यांना सूर्याची मदत मिळणार आहे. ज्यामुळेच ते स्वतःला रिचार्ज करू शकणार आहे. लँडर आणि रोव्हर दोघेही सौरऊर्जेवर काम करतात. यादरम्यान रोव्हर प्रज्ञान पाणी, खनिज माहिती शोधून तेथील भूकंप, उष्णता आणि मातीचाही अभ्यास करणार आहे.
ADVERTISEMENT
‘इस्त्रो’ जगात भारी
इस्त्रोचे अर्धे यश हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यापासूनच मिळाले आहे. त्यामुळे आता चंद्राविषयी ठोस माहिती गोळा करणे हेच खरे आव्हान ठरणार आहे. लँडिंगनंतर रोव्हर प्रज्ञान मून वॉक करणार आहे. पण त्याला चंद्रावर घेऊन जाण्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानकडे फक्त 14 दिवस आहेत. हा चंद्राचा एक दिवस आहे, त्यानंतर रात्र सुरू होणार आहे. या परिस्थितीत, त्यांना दिवसाच्या प्रकाशात सर्व डेटा गोळा करावा लागणार आहे. विक्रम लँडर जिथे आहे, तिथून त्याची त्याची हालचाल होणार नाही. प्रज्ञान रोव्हर लँडर विक्रमपासून वेगळे होत तिथून ते पुढे जाईल आणि ते जिथे जाईल तिथे डेटा गोळा करणार आहे. त्यामुले प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर यांच्या मार्फत सर्व डेटा इस्रोला पाठवणाला जाणार आहे.
ADVERTISEMENT
भारताची नवी उंची
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्त्रोनुसार, लँडर आणि रोव्हरमध्ये पाच वैज्ञानिक पेलोड आहेत, जे लँडर मॉड्यूलमध्ये ठेवण्यात आले आहेत. रोव्हरच्या अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) चा वापर रासायनिक क्रिया प्रतिक्रिया मिळवण्यासाठी आणि चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती घेण्यासाठी खनिज रचनाचा अंदाज घेण्यासाठी केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी रोव्हरमुळे चंद्र मोहिमांमध्ये नवीन उंची गाठता येणार आहे.
ADVERTISEMENT