Maratha Reservation : आरक्षणाचा वाद पेटला, भुजबळांचं चॅलेंज जरांगे स्वीकारणार का?
3 कोटी मराठे मुंबईत आणणार होते, ते बघितले सर्वांनी. 3 कोटी किती आहे ते वाशिला कळालं. ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसे मंडल आयोगाला विरोध करतायत, असा टोला देखील भुजबळांनी जरांगेंना लगावला.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal challenge to Manoj jarange patil, Maratha Reservation : राज्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange patil) चँलेंज दिले आहे. मनोज जरांगे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगा विरोधात आवाज उठवावा. मंडल आयोगाला संपवण्याचे काम त्यांनी करून दाखवावं. असे आव्हान भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेना दिले आहे. भुजबळांच्या या आव्हानावर जरांगेनी आधीच मंडल आयोगाला मी चँलेज करणार असल्याचे म्हटले आहे. (chhagan bhujbal direct challenge to manoj jarange patil maratha reservation mandal ayog obc reservation)
ADVERTISEMENT
छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते.त्यावेळी पत्रकारांनी भुजबळांना मनोज जरांगे मंडल आयोगाला चँलेंज करणार असल्याचा सवाल केला होता. यावर भुजबळ म्हणाले की, त्यांच्यात (मनोज जरांगे) हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात आवाज उठवावा, त्याच्याविरूद्ध कारवाई करावी. माझे चॅलेंज आहे त्यांना (मनोज जरांगे) हिंमत असेल तर त्यांनी करून दाखवावं, मंडल आयोगाला संपवण्याचे काम त्यांनी करून दाखवावं, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा
मनोज जरांगेनी मंडल कमिशनला आव्हान द्यायलाच पाहिजे कारण भारतात त्यांच्या इतका ज्ञानी कुणीच नाही आहे. 3 कोटी मराठे मुंबईत आणणार होते, ते बघितले सर्वांनी. 3 कोटी किती आहे ते वाशिला कळालं. ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसे मंडल आयोगाला विरोध करतायत, असा टोला देखील भुजबळांनी जरांगेंना लगावला.
हे वाचलं का?
मनोज जरांगे काय म्हणाले?
माझी त्यांना (छगन भुजबळ) पुन्हा विनंती आहे. त्यांनी अशी चँलेज देऊ नये. आणि गोरगरीबांचे वाटोळे आम्हाला नाही करायचं. कुणाच्या लेकरांच वाटोळ करून आम्हाला आमची लेकरं मोठी नाही करायची, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.आम्ही सुद्धा पुराव्यानीशी बोलत नाही. गोरगरीब ओबीसी समाजाने त्याला समजवून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तू गोरगरीब पोरांच नको वाटोळ करू. असे चँलेज देऊन तीन सभा घेऊन त्यांनी तीन केसेस मागे घेतल्या. ओबीसी समाजाने त्याला शांत करावं. आऱक्षणाबद्दल त्याने चँलेंज करू नये. काहीही होऊ शकतं, असे जरांगे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Divya Deshmukh : ‘माझे कपडे, केस आणि…’, नागपूरची बुद्धिबळपटू दिव्यासोबत काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT