Ladki Bahin Yojana : बहिणींच्या पैशांवर भावांचा डल्ला, 12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून भरला अर्ज; कशी झाली पोलखोल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhatrapati sambhaji nagar news 12 brother apply for ladki bahin yojana scheme women photo fraud kannad district
12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून भरला अर्ज
social share
google news

बातम्या हायलाइट

point

12 भावांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला

point

12 जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव

point

आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज

Ladki Bahin Yojana News : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात आता छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) कन्नड  (Kतालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 12 भावांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचा प्रकार समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या 12 जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या 12 जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. (chhatrapati sambhaji nagar news 12 brother apply for ladki bahin yojana scheme women photo fraud kannad district)  

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. त्यात 12 भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले आहेत.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नारी शक्ती App आणि वेबसाईट झाली बंद, महिलांनी आता करायचं काय?

दरम्यान काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल 30 अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचं उघड झाले होते. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडवली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी असे अर्ज केल्याचा अंदाज आहे.

हे वाचलं का?

कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले असून त्यातील 90 हजार 957  मंजूर करण्यात आले आहेत, तसेच तांत्रिक कारणाने 428 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, तर 357 रद्द केले आहेत. दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जांची या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता भलतेच प्रकार समोर आले. तालुक्यातील 12 जणांनी स्वत:च्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वत:च्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वत:च्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने पडताळणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आले.

कन्नडमधील त्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. या योजनेतून एकही महिला वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. परंतु बोटावर मोजण्या इतके लोकांनी कन्नडसारखा प्रकार केला आहे. आता त्याची चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे, असे शंभूराज देसाई यांनी या घटनेवर म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lalbaugcha Raja: लालबागच्या राजासमोरून धक्के मारून बाहेर काढलेली 'ती' अभिनेत्री कोण?

तर आम्ही तुरुंगात टाकणार

बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेऊ इच्छितात. हे लक्षात घ्या, तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळेच पाहिजे असेल तर सरकारची तिजोरी खाली होईल. मग ब्रह्मदेव आला तरी शक्य नाही,असे अजित पवार म्हणाले आहेत. एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT