Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण पुतळा दुर्घटनेत पहिला आरोपी गजाआड, चौकशीतून नवीन माहिती समोर येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhatrapati shivaji maharaj statue collapsed kolhapur local crime branch arrest chetan patil send sidhudurg police for further inquiry malvan case
चेतन पाटीलला पोलिसांनी घेतलं ताब्यात
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चेतन पाटीलला मध्यरात्री पोलिसांनी घेतलं ताब्यात

point

कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

point

चेतन पाटीलला मालवण पोलिसांकडे केले सूपुर्द

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याप्रकरणी पोलिसांना आता मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे  (Jaydip Apte) याचा पार्टनर आणि बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला (chetan Patil) कोल्हापूरमधून (Kolhapur) अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्रीही कारवाई केली आहे. (chhatrapati shivaji maharaj statue collapsed kolhapur local crime branch arrest chetan patil send sidhudurg police for further inquiry malvan case) 

ADVERTISEMENT

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि शासनाची फसवणकू केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. 

हे ही वाचा : महायुतीत रंगलं महाभारत! तानाजी सावंतांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर NCP ला संताप अनावर!

या गुन्ह्यानंतर पोलीस जयदीप आपटे आणि चेतन पाटीलच्या मागावर होती. या दरम्यान जयदीप आपटे हा फरार झाल्याची माहिती समोर आली होती. तर गेल्या तीन दिवसांपासून सिंधुदुर्ग मालवण पोलीस, कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने चेतन पाटीलचा शोध घेत होती. त्यामुळे चेतन पाटीलला ताब्यात घेण्याच्या हालचाली कोल्हापुरात संयुक्तरित्या सुरू होत्या. पण चेतनचा काही थांगपता लागत नव्हता. 

हे वाचलं का?

या दरम्यान काल मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने  (LCB)चेतन पाटीलचा माग काढण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता चेतन पाटीलला  पोलिसांनी  घेत ताब्यात घेतलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पेठ भागात चेतन पाटील याचा बंगला आहे. या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस तपास करत होते. अखेर या तपासात पोलिसांना यश आले आहे. आता कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला मालवण पोलिसांकडे सुपूर्द केल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहेत.

चेतन पाटील याला मालवण पोलिस ठाण्यात आणले जाणार असून त्याची चौकशी करण्यात येईल. चौकशीतून शिवरायांच्या पुतळ्याबाबत कोणती नवीन माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चेतन पाटील याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जो चबुतरा उभारला होता, त्याचे डिझाईन नौदलाला तयार करून दिले होते. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Gold Price Today: सोन्याचा भाव पाहूनच म्हणाल, बाई... हा काय प्रकार? जाणून घ्या 1 तोळ्याची किंमत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT