Pune: ‘आम्ही देवालाही सोडत नाही..’, पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवारांची जोरदार फिल्डिंग?
पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुन्हा आपल्याला मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. त्याच स्वरुपात त्यांनी आजचं भाषण केलं आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले अजित पवार.
ADVERTISEMENT
Ajit Pawar on Pune Guardian Minister: पुणे: पुण्यातील (Pune) बहुचर्चित चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचं आज उद्घाटन करण्यात आलं. ज्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे हजर होते. पण यावेळी पुणेकरांचं कौतुक करत अजित पवारांनी जोरदार भाषण केलं. एकीकडे पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे जाणार का अशी चर्चा सुरू असताना आज (12 ऑगस्ट) अजित पवारांनी ज्या पद्धतीने पुण्याचा उल्लेख केला किंवा त्याबाबत भाष्य केलं. त्यावर अशीही चर्चा सुरू झाली आहे की, पुण्याच्या पालकमंत्री (Guardian Minister) पदासाठी अजित पवार यांनी आता जोरदार फिल्डिंग लावली आहे. (dcm ajit pawar is trying to get the post of guardian minister of pune district know what exactly ajitdada said)
ADVERTISEMENT
अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या मंत्रिपदासह पालकमंत्री पदावरील अनेक गोष्टींवर आता बरंच राजकारण रंगलं आहे. एकीकडे अजित पवारांना सोबत घेतल्याने शिंदे गट नाराज झाला आहे. तर दुसरीकडे आता भाजपमधील आमदार आणि नेतेही नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता पालकमंत्री पदावरुन भाजपमध्येच मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे जिल्हा हा कायमच अजित पवार यांच्यासाठी आवडीचा राहिला आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र, सत्ता गेल्यानंतर नव्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं.
हे वाचलं का?
आता अशीही चर्चा आहे की, अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र, चंद्रकांत पाटलांसारख्या वजनदार नेत्याकडे हे पद असल्याने ते एका झटक्यात अजित पवारांना देता येणं शक्य नसल्याची जाणीव राज्यातील भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळेच आता हे पालकमंत्री पद अजित पवारांना कसं दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा>> शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार का नाराज?, ‘हे’ आहे कारण!
मात्र, असं असताना आपल्याला पुण्याविषयी अधिकची माहिती असल्याचं अजित पवारांनी आपल्या भाषणातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अजित पवार हे येथील पालकमंत्री पदाची सुप्त इच्छा बाळगून असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
‘आमच्या इथले काही-काही जणांना हेही माहिती नसतं की, पुण्यातील झेंडावंदन 15 तारखेला कोण करतं. पुण्याची परंपरा आहे की, 15 ऑगस्टला झेंडावंदन राज्यपाल करतात. तरी यांना खुमखुमी काय.. तर चंद्रकांतदादा करणार की, अजितदादा करणार. अरे काय घेणं-देणं आहे तुम्हाला..’
ADVERTISEMENT
पुण्याचं पालकमंत्री पद अन् अजित पवारांचं भाषण
‘राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात झेंडावंदन करतात, इथलं राज्यपाल करतात आणि 26 जानेवारीचं राज्यपाल करतात शिवाजी पार्कला. अशी ती पद्धत आहे. त्यामुळे उगीच लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम करू नका.’ असं म्हणत अजित पवारांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावर काहीसं भाष्य यावेळी केलं आहे.
जेव्हा अजितदादा पुण्याविषयी दिलखुलास बोलतात…
दरम्यान, आपल्या भाषणात अजित पवार हे पुण्याविषयी अत्यंत दिलखुलासपणे बोलत होते. ते म्हणाले, ‘खरं तर या चौकाचं नाव आपल्या महानगरपालिकेच्या दफ्तरी एनडीए चौक असं आहे. पण सुरुवातीपासून या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखलं जातं. येथील जुनी लोकं सांगतात की, जुन्या पुलावर दगडावर चांदणी कोरलेली होती. त्यामुळे चौकाला चांदणी चौक नाव पडलेलं. आता बऱ्याच दगडावर बरीच नावं कोरलेली असतात. हार्ट काढलेला असतो, बाण काढलेला असतो.. आता त्याला कोणतं नाव द्यावं?’
‘आम्ही पुणेकर कोणालाही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवायला मागे-पुढे बघत नाही. जगात आपल्या पाट्या गाजल्या आहे. पुणेकरांची पाटी.. आणि गडकरी साहेब आम्ही देवांना देखील सोडलेलं नाही. आमच्या पुण्यातील देवांचीच नावं बघा.. निवडुंग विठोबा, पासोड्या विठोबा, जिलेब्या मारुती, खुन्या मारुती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा.. उपाशी विठोबा, गुडघेमोडी माता, माती गणपती, गुपचूप गणपती, गुंडाचा गणपती, बिजवर विष्णू, खुन्या मुरलीधर.. आता यापुढे आम्ही काय सांगू. म्हणजे त्यातही आम्ही मागे नाहीत.’
हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून..’, CM पदावरुन अजितदादांची तुफान बॅटिंग
‘मात्र कुणालाही काहीही नावं ठेवली तरी पुणेकर कोणत्याही गोष्टीवर प्रेम देखील अगदी मनापासून करतो. सगळ्या पुणेकरांचं या चांदणी चौकावर मनापासून प्रेम आहे. आणि गडकरी साहेब आमचं तुमच्यावर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर देखील भरपूर प्रेम आहे. त्यामुळे त्या प्रेमाची उतराई आणि दोघेही नागपूरचे आहेत. तुम्ही जरा आम्हाला विलंब लावला, तुम्ही खरं आधी मेट्रो आम्हाला द्यायची होती आणि मग नागपूरला न्यायची होती. आम्ही खचाखच भरून मेट्रो चालवली असती. पण ठीक आहे देर आए दुरुस्त आये, काही हरकत नाही.’असं अजित म्हणाले. पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवारांनी एकप्रकारे पालकमंत्री पदासाठीच फिल्डिंग तर लावली नाही ना? अशी चर्चाही पुण्यात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT