Shirdi Sai Baba Temple: निवडणुकीच्या धामधूमीत साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shirdi Sai Mandir Latest News
Shirdi Sai Mandir Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिर्डीच्या साईबाबा मंदिराबाबत मोठी अपडेट समोर

point

कोरोना काळात नेमकं काय घडलं होतं?

point

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेे दिला 'हा' निर्णय

Shirdi Saibaba Mandir Latest News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मागील पाच वर्षांपासून साई मंदिरात समाधीवर फुले, हार नेण्यास बंदी होती. कोविड काळात साई मंदिराचे दरवाजे 500 दिवस बंद करण्यात आले होते. परंतु, आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साई मंदिरात फुले-हार नेण्यास लागू केलेली बंदी उठवली आहे. 

ADVERTISEMENT

कोविड काळात साई मंदिराचे दरवाजे तब्बल 500 दिवस भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. कोविड गाईडलाईन्समुळे मंदिरात फुल हार नेण्यास बंदी होती. मात्र त्यानंतर साई संस्थानच्या या धोरणाविरोधात, फुल विक्रेते आणि उत्पादक शेतक-यांनी औरगांबाद खंडपीठात दाद मागितली होती, त्यावर आज सकारात्मक निर्णय देत पाच वर्षांनी न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. 

हे ही वाचा >>  Narendra Modi: खुशखबर! PM नरेंद्र मोदींनी महिलांसाठी केली 'या' मोठ्या योजनेची घोषणा

साई मंदिरात फुले, हार नेण्यास सुरुवात होत असल्याने शिर्डीतील फुल विक्रेते, फुल उत्पादक शेतकरी आणि विखे समर्थकांनी जल्लोष करत न्यायालयाच निकालाच स्वागत केलं. निवडणुकीच्या प्रचारात, फुल-हार बंदीवरुन महाविकास आघाडीकडून विखे पाटलांवर टीकास्र सोडले जात होते. आता फुल हार बंदी उठल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याचे श्रेय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Lokpoll Survey: महायुती सरकारला धोका? मविआला किती जागा मिळणार? लोकपोलच्या सर्व्हेनं उडवली खळबळ

कोरोना काळात साई मंदिरात हार-फुले नेण्यास बंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. 2020 मध्ये जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. या महामारीमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. देशातील मंदिर, प्राथनास्थळेही बंद करण्यात आली होती. शिर्डीचे साईबाब मंदिरही भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही मंदीरे सुरु करण्यात आली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT