Maharashtra Minister: महायुतीत 'हे' होणार मंत्री?, यादीच आली समोर पण...

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी

point

महायुतीमधून कोणाकोणाला मिळणार संधी

point

मंत्रिपदासाठी महायुतीचा कसा आहे फॉर्म्युला

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती भरघोस यश मिळालं आहे. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या आहेत. अशावेळी आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, नेमक्या कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात नेमके किती मंत्री होऊ शकतात?

विधानसभेचं संख्याबळ 288 आहे, त्यापैकी 15 टक्के मंत्रिपदाची संख्या आहे. म्हणजे महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात. ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात. 

मंत्रिपदासाठी महायुतीचा काय फॉर्म्युला?

6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो. भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या साधारण 24 मंत्र्यांसह सत्तेत सर्वात मोठा असेल.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Sharad Pawar: 'निकालानंतर एखादा घरी बसला असता, पण मी काही...', शरद पवारांचं मोठं विधान

यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचा नंबर लागेल. कारण त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना 12 मंत्रिपदं मिळू शकतील. तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळू शकतात. कारण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत. 

दरम्यान, आता मंत्रिपदासाठी महायुतीत नेमकी कोणाकोणाची वर्णी लागू शकते हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

भाजपचे संभाव्य कॅबिनेट मंत्री

  • देवेंद्र फडणवीस
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • गिरीश महाजन
  • सुधीर मुनगंटीवार
  • चंद्रकांत पाटील
  • आशिष शेलार
  • प्रविण दरेकर
  • रवींद्र चव्हाण
  • राहुल कुल
  • मंगलप्रभात लोढा
  • संभाजी पाटील निलंगेकर
  • गणेश नाईक 

भाजपचे संभाव्य राज्यमंत्री

  • नितेश राणे
  • संजय कुटे
  • शिवेंद्रराजे भोसले
  • माधुरी मिसाळ
  • राणा जगजितसिंह पाटील
  • गोपीचंद पडळकर
  • प्रसाद लाड

हे ही वाचा>> Congress on Assembly Elections Result : "आम्ही ठाकरेंना मदत केली नाही आणि...", काँग्रेसनेत्यानंच सांगितलं पराभवाचं कारण

शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री 

  • एकनाथ शिंदे
  • शंभूराज देसाई
  • उदय सामंत
  • गुलाबराव पाटील
  • दादा भुसे
  • संजय राठोड
  • भरत गोगावले

शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री

  • संजय शिरसाट
  • प्रताप सरनाईक
  • राजेंद्र यड्रावकर
  • विजय शिवतारे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य कॅबिनेट मंत्री 

  • अजित पवार 
  • छगन भुजबळ
  • दिलीप वळसे-पाटील
  • हसन मुश्रीफ
  • धनंजय मुंडे
  • धर्मरावबाबा अत्राम 
  • आदिती तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य राज्यमंत्री

  • संजय बनसोडे
  • संग्राम जगताप
  • इंद्रनील नाईक
  • मकरंद पाटील
  • सुनील शेळके
  • माणिकराव कोकाटे

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT