Viral News: गर्भवती महिलेला सुट्टी दिली नाही! बाळाचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांनी केली कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pregnant Woman Lost Her Baby
Pregnant Woman Odisha News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गर्भवती महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

point

उपमुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

point

त्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

Todays Viral News: महिला आणि बालविकास विभागात नोकरी करणाऱ्या एका गर्भवती महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. क्लर्क या पदावर काम करणाऱ्या वर्षा प्रियदर्शनी सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. परंतु, बाल विकास विभागाच्या अधिकारी (CPDO) स्नेहलता साहू यांनी वर्षाला प्रसुतीच्या वेदना होत असतानाही सुट्टी दिली नाही आणि मेडिकल चेकअपही केला नाही, त्यामुळे महिलेच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप साहू यांच्यावर केला जात आहे. ओडिसा येथील या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून तातडीनं कारवाईची मागणी केली जात आहे.

क्लर्क वर्षा प्रियदर्शनी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मागील तीन वर्षांपासून मला त्रास दिला जात होता. यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. या नाहक त्रासाचा थेट परिणाम माझ्या मुलावर झाला. सीडीपीओ मॅडमने मला खूप त्रास दिला. मी गर्भवती झाल्यानंतर मला खूप त्रास दिला गेला. मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana: 'काहीही फुकट...', लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचं सडेतोड विधान!

तरीही मी काम करत होती. मला प्रसुतीच्या वेदना होत असतानाही सीपीडीओ स्नेहलता साहूने कार्यालयातून जाण्याची परवानगी दिली नाही. तसच कोणत्याही प्रकारची मेडिकल हेल्प केली नाही. त्यानंतर मी कुटुंबातील सदस्यांना याबाबत सांगितलं. त्यांनी मला खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी गर्भात असलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेत या राज्याच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सीपीडीओ स्नेहलता साहू यांना पदावरून हटवण्यात आलं. तसच जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT