Today Gold Rate: सोन्याने नादच केलाय थेट! दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक भाव, 1 तोळ्याचा दर किती?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ

point

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना सोनं-चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच!

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Prices Today : गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना सोनं-चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. चला तर मग आज (30 ऑक्टोबर 2024) सोन्याच्या किंमतीत कोणते बदल झाले आहेत सविस्तर जाणून घेऊया. (gold silver record break prices on diwali in maharashtra today 30 october 2024 Check out 24 22 and 18 carat gold rates

ADVERTISEMENT

दिवाळीची खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे. तुम्ही देखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या आधी तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे जर जाणून घ्या. काही भागांत सोन्याचा दर कमी झाला असून चांदीचा दर स्थिर आहे. तर काही भागांत सोन्याचा दर आजही वाढलेलाच आहे.

(Gold-Silver prices hike before diwali festival what are the rates of 24 22 and 18 carat today 22 october 2024 mumbai pune nashik)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. 

Good Return वेबसाईटनुसार, मंगळवारी (29 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,450 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 10 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 80,460 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,750 रूपये होता. त्यातही 10 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 73,760 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 99,100 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

ADVERTISEMENT

भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold Rate In Mumbai

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,760 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,460 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,350 रूपये आहे.

Gold Price in Pune

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,760 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,460 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,350 रूपये आहे.

Today Gold price in Nagpur

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,760 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,460 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,350 रूपये आहे.

Price of Gold in Nasik

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,790 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,490 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,380 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT