Mumbai rain Update : पावसाने मुंबई धरली वेठीस! लोकल रखडल्या, रस्ते पाण्याखाली
Mumbai Rain Today : मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy Rain In Mumbai) सुरू आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Mumbai Rain Updates : मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy Rain In Mumbai) सुरू आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे सकाळी मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (due to heavy rains there is water in Mumbai the local service of Central Railway is disrupted holidays announced for schools and colleges)
ADVERTISEMENT
आज दिवसभर देखील पाऊस जोरदार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : Maharashtra Rain Update : रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी, इतर जिल्ह्यांमध्ये हवामान काय?
3-4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 8 जुलै ते 10 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे वाचलं का?
मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत
कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. काही रेल्वेंच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे प्रवासाचे मार्ग लहान करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या (सीआर) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मर्यादित वेगाने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
हेही वाचा : Worli Accident : मिहीर शाहाने दारू प्यायली होती का? बार मालकाने काय सांगितलं?
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'वासिंद-खर्डी सेक्शनवर पहाटे 3 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने ट्रॅकच्या तटबंदीचे नुकसान झाले, ओव्हरहेड इक्विपमेंट' (ओएचई) खांब वाकला आणि एक झाड उन्मळून पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.'
ADVERTISEMENT
मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले
दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे. मात्र, वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यातही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.
हेही वाचा : Team India च्या विजयी रॅलीत 'हा' पोलीस ठरला 'मॅन ऑफ द मॅच'! नेमकं केलं काय?
महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा?
पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती IMD ने रविवारी दिली आहे. या काळात जोरदार वारे आणि वादळे येऊ शकतात. तसेच मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT