Education Fees : 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा, फीबाबत सरकारचा मोठा निर्णय

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

ebc ews sebc obc student big decision higher and technical education department government has decided not to charge education and examination fees from the students
EBC, EWS, SEBC आणि OBC विद्यार्थ्यांना दिलासा,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

point

शिक्षण व परीक्षा शुल्क न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला

point

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन परिपत्रक जारी

Education Fees : आर्थिक दृष्ट्या मागास (EBC),आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS),सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC)इतर मागास प्रवर्गातील (OBC)विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण व परीक्षा शुल्क न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन परिपत्रक जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (ebc ews sebc obc student big decision higher and technical education department government has decided not to charge education and examination fees from the students)

उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याआधी शिक्षण व परीक्षा शुक्लामध्ये 50 टक्के सुट देण्यात होती. मात्र आता त्यांना 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागास (EBC),आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS),सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC)इतर मागास प्रवर्गातील (OBC)विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : Ladka Bhau Yojana Website: लाडका भाऊ योजनेसाठी वेबसाइट सुरू, CM शिंदेंनी लिंकच दिली!

एबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी शुल्काची मागणीसाठी आग्रह धरल्यास शिक्षण संस्थान विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sharad Pawar : ''धाड, धाड इंग्रजी...गाडी जी सुटली...'', पवारांकडून निलेश लंकेंच्या इंग्रजीचं कौतुक

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT