Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका, नेमकं काय झालं?
Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. रविवारी (5 नोव्हेंबर) ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
Eknath Khadse Heart Attack News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) दुपारी ही माहिती समोर आली. त्यांना तातडीने जळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे. त्यांना मुंबईत आणण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार खडसे यांना छातीत त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावमधील गजानन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा >> गजानन कीर्तिकरांच्या मतदारसंघावर रामदास कदमांनी केला दावा, जाहीर केलं उमेदवाराचं नाव
एकनाथ खडसेंना नेमका कोणता त्रास?
डॉक्टरांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांना छातीमध्ये त्रास होत होता. ते तपासणीसाठी रुग्णालयात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत, पण पुढील तपासण्या आणि उपचारांची गरज आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला नेण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘साहेब याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील..’, जरांगे-पाटलांचा कोणाला थेट इशारा?
त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे, कारण त्यांची आधीपासून तिथेच ट्रिटमेंट सुरू आहे. त्यांना आता छातीत दुखण्याचा त्रास नाहीये. त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना
एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही माहिती कळताच त्यांनी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. एकनाथ खडसे यांना एअर अॅम्ब्युलन्सने जळगावातून मुंबईत आणण्यात येणार आहे. रात्री ९ वाजेपर्यंत त्यांना मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT