PF interest : पीएफ धारकांना दिवाळी भेट! खात्यावरील व्याजासंदर्भात सरकारने दिली मोठी अपडेट
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF खात्यांमध्ये व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर 8.15 व्याजदर निश्चित केला असून काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम आधीच जमा झाली आहे.
ADVERTISEMENT
PF interest Credit : सणासुदीच्या हंगामात देशभरातील 7 कोटी पीएफ धारकांना सरकारने दिवाळी भेट दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत पेन्शन खात्यावरील व्याज आता पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF खात्यांमध्ये व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर 8.15 व्याजदर निश्चित केला असून काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम आधीच जमा झाली आहे. तथापि, खात्यांमध्ये व्याजाची रक्कम दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
ADVERTISEMENT
पीएफची रक्कम हा उत्पन्नाचा मोठा भाग असतो. दरमहा, नोकरदारांच्या पगारातून कपात केली जाते आणि भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली जाते. देशात सुमारे 7 कोटी सक्रिय ईपीएफ खाती आहेत. या 7 कोटी पीएफ धारकांना आता दिलासा मिळाला आहे. दरम्यान तुमच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम आली आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासू शकता. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की पीएफ खात्यात कोणत्या महिन्यात किती पीएफ जमा झाला? त्यात कंपनीचे योगदान काय? एकूण रक्कम किती आहे? तर तुम्ही या माध्यमातून तपासता येणार आहे.
हे ही वाचा : ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधीच मोठा राडा! बॅनर फाडले, नोटीसा बजावल्या, जमावबंदीचे आदेश… काय घडलं?
ऑनलाईन असे तपासा
- EPFO च्या पोर्टलला https://www.epfindia.gov.in/site_en/For_Employees.php येथे भेट द्या
- मुख्यपृष्ठावर, ‘सेवा’ वर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन सूचीमधून ‘कर्मचाऱ्यांसाठी’ निवडा.
- ‘सदस्य पासबुक’ लिंकवर क्लिक करा आणि ते लॉग इन पृष्ठावर नेईल.
- तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), पासवर्ड आणि कॅप्चा वापरून खात्यात लॉग इन करा.
- तुम्ही तुमचे खाते तपशील आणि EPF शिल्लक तुमच्या समोर येईल.
एसएमएसद्वारे पीएफ तपासा
तुम्ही तुमचा UAN क्रमांक वापरून एसएमएसद्वारे पेन्शन खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. खात्यातील शिल्लक तपशील इंग्रजीमध्ये प्राप्त करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ वर “EPFOHO UAN ENG” लिहून पाठवा. ही सेवा आता इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ashish Shelar : ‘सलीम-जावेद मोठे असतील, पण मराठी कलाकार…’, भाजपाचा राज ठाकरेंना टोला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT