Gateway of India Boat Accident: नौदलाच्या बोटीने सरळसरळ मारली धडक, 'तो' भयानक Video जसाच्या तसा...
Mumbai Boat Accident: मुंबईनजीकच्या समुद्रात झालेल्या बोटीच्या अपघाताचा व्हीडिओ हा आता समोर आला आहे. नीलकमल नावाच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटीने धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईच्या समुद्रात झाला बोटचा भीषण अपघात
नौदलाच्या स्पीड बोटने दिली प्रवाशी बोटीला धडक
बोटीला धडक दिल्याचा Video आला समोर
Gateway of India Accident: मुंबई: मुंबईच्या गेट ऑफ इंडिया ( Gateway of India) येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीनेच धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचं आता समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या क्षणी नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली तो क्षण देखील कॅमेऱ्यात आता कैद झाला आहे. ही दृश्य पाहून आपल्याला अपघाताची नेमकी तीव्रता लक्षात येईल. (exclusive video navy speed boat hits passenger boat named neelkamal horrific accident caught on camera)
ADVERTISEMENT
खोल समुद्रात बोट उलटल्याने त्यात जीवितहानी झाल्याची भीतीही आता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु केलं. मिळालेल्या माहितीनुसार, नीलकमल बोटीत एकूण 80 प्रवाशी होते. जे या बोटीतून प्रवास करत होते. यापैकी साधारण 66 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं. तर 7 ते 8 जण काही प्रवासी हे अद्यापही बेपत्ता आहेत.
हे ही वाचा>> Mumbai News: मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी बोट समुद्रात उलटली! 80 प्रवाशांचं काय झालं?
नेमका अपघात कसा झाला?
Boat Accident Mumbai:दरम्यान या दुर्घटनेबाबत अपघातग्रस्त नीलकमल लाँचचे मालक राजेंद्र परते यांनी नेमकी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'आमची बोट रोज अडीच वाजेच्या सुमारास एलिफंटाला जाते. आज बोट सव्वा तीन वाजता निघाली. काही अंतर कापून पुढे गेल्यानंतर आमची बोट जिथे होती तिथे एक नौदलाची (Navy) स्पीड बोट आली. त्या स्पीड बोटीने आधी एक राऊंड मारला आणि ती दूर निघून गेली. पण पुन्हा एकदा ती आमच्या दिशेने आली.. तेव्हाच त्या स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक मारली. त्यामुळेच हा अपघात झाला.'
हे वाचलं का?
'अपघात झाला तेव्हा आमच्या बोटीत 80 लोकं होतं. किती जणांना वाचवलं हे काही आम्हाला समजू शकलेलं नाही. पण आमच्या बोटीची प्रवाशी क्षमता ही 130 एवढी आहे.'
हे ही वाचा>> Viral Video: मुंबईच्या AC ट्रेनमध्ये खळबळ! नग्न अवस्थेत असलेला पुरुष चढला महिलांच्या डब्ब्यात, महिलांनी आरडाओरडा करताच...
'हा व्हीडिओ बोटीवरील प्रवाशानेच काढला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, ज्यामध्ये नीलकमल बोटीचे दोन तुकडेच झाले आहेत.' अशी माहिती नीलकमल बोटीचे मालक परते यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT