Mahakumbh Video: चेंगराचेंगरीनंतर महाकुंभ मेळ्यात अग्नीतांडव! 15 टेन्ट जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kumbh Mela Fire Accident : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडलीय. महाकुंभच्या सेक्टर-22 मध्ये आग लागल्याने अनेक टेन्ट जळून खाक झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाकुंभ मेळ्यात लागली भीषण आग!

आगीच्या घटनेत 15 टेन्ट जळून खाक

महाकुंभ मेळ्यात नेमकं घडलं तरी काय?
Kumbh Mela Fire Accident : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडलीय. महाकुंभच्या सेक्टर-22 मध्ये आग लागल्याने अनेक टेन्ट जळून खाक झाले आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आलीय. आग लागण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांकडून भाविकांना शांततेचं आवाहन करण्यात येत असून या घटनेचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमध्ये लागलेल्या आगीत 15 टेन्ट जळून खाक झाले. आग लागल्याचं कळताच तातडीनं अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्मिशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून टेन्टला लागलेली आग नियंत्रणात आणली.
अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद शर्मा यांनी माहिती दिली की, आज छतनाग घाट परिसरात 15 टेन्टला आग लागल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. एसडीएमने दिलेल्या माहितीनुसार, इथे एक अनधिकृत टेन्ट लावण्यात आला होता. आगीवर नियंत्रण मिळवलं असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे ही वाचा >> Manoj Jarange: "आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोर...", मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा
हे ही वाचा >> 'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
याआधीही घडली होती आगीची दुर्घटना
याआधी महाकुंभमध्ये दोन वेळा आग लागल्याची घटना घडली होती. सेक्टर 2 मध्ये दोन कारला आग लागल्याने खळबळ उडाली होती. या घटनेतही जीवितहानी झाली नव्हती. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग विझवली होती. तसच 19 जानेवारीला महाकुंभ मेळ्यात सेक्टर 19 मध्ये आगीची दुर्घटना घडली होती. या घटनेतही 18 टेन्ट जळून खाक झाले होते.