Gold Price Today: लयच भारी! आजही घसरल्या सोन्याच्या किंमती; 24 कॅरेटचा भाव काय?
Gold Rate : सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. आज (23 ऑगस्ट) व्यापाराच्या पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत काहीशी घट झालेली दिसून येत आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आज सोन्याच्या किंमती घसरल्या
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव काय?
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
Gold-Silver Rate : सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असली तरी, दरवेळी भाव कमी-जास्त होत आहेत. आज (23 ऑगस्ट) व्यापाराच्या पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत काहीशी घट झालेली दिसून येत आहे. देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी वाढली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अशावेळी आजचे सोन्याचे भाव कितीने कमी झाले आहेत जाणून घेऊयात. (gold-silver price decreased today 23 august 2024 gold rate in mumbai pune for 10 gram )
ADVERTISEMENT
मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी-मंदी नोंदवली जात आहे. अलीकडेच अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली होती, पण जागतिक घडामोडींमुळे पुन्हा एकदा सोने भाव खाऊ लागले.
Goodreturns वेबसाइटनुसार, कालच्या तुलनेत (22 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात 220 रूपयांनी घसरण झाली असून 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याची किंमत 72,870 रूपयांवरून 72,650 रूपये झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव 300 रूपयांनी कमी झाला असून त्याची किंमत 86,700 रूपये इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Sharad Pawar Z Plus Security : शरद पवारांना आत्ताच का दिली Z प्लस सुरक्षा?
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 630 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 680 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 520 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra Weather: बाई... मुंबईत तर पाऊस पडेनाच! तुमच्या जिल्ह्यात IMD चा अंदाज का?
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT