Gold Price: बाप्पाच पावला! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कोसळले; पाहा आजचा 24 कॅरेटचा भाव...
Gold Rate Today : आज गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाचे आगमन होताच सोने व चांदीचे भाव आज कोसळले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीने उच्चांक गाठला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाप्पाचे आगमन होताच सोने व चांदीचे भाव आज कोसळले
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : आज गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाचे आगमन होताच सोने व चांदीचे भाव आज कोसळले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीने उच्चांक गाठला आहे. पण गणपती बाप्पाचे आगमन होताच दोन्ही धातूंचे दर कोसळले आहेत.अशावेळी आज (७ सप्टेंबर २०२४) सोने व चांदीच्या किंमती काय आहेत हे आपण जाणून घेऊयात… (gold-silver prices collapsed today on Ganesh Chaturthi 07 september 2024 in maharashtra know the details)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज शनिवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024: आजच्या दिवसाचे शुभ संयोग, पूजेसाठी फक्त इतके तास, जाणून घ्या मुहूर्त
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी (06 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 310 रूपये होता. पण आज यामध्ये 440 रूपयांनी घट झाली असून तो 72, 870 रूपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही 400 रुपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 2,500 रूपयांनी घटली असून 84,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,830 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,990 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,690 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra Weather: बाप्प्पाच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा तुमच्या शहरातील IMD चा अंदाज
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT