Gold Rate: सोन्याच्या दरवाढीला ब्रेक? आज 1 तोळ्याच्या किंमतीत किती रूपयांनी झाली घसरण?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला ब्रेक?

point

सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver prices : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. सणासुदीचे दिवस सुरु होताच सोन्याने विक्रमी उसळी घेतल्याने ग्राहकांचं टेन्शन वाढलं आहे. मात्र आता सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला ब्रेक लागल्याचं दिसत आहे. सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशात आज (15 ऑक्टोबर 2024) सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. हे बदल किती रूपयांनी झाले आहेत यावर एक नजर टाकूयात. (Gold-Silver prices down 24 22 and 18 carat gold today 15 october 2024 in maharashtra mumbai Pune nagpur what are the rates know)

ADVERTISEMENT

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (14 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,620 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 200 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 77,400 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,150 रूपये होता. जो 200 रूपयांनी घटला असून त्याची किंमत 70,950 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 96,900 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं ठरली! चित्रा वाघ यांच्यासह 'हे' 7 जण होणार आमदार!

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रूपये आहे.

नागपूर

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,170 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,430 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,240 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Maharashtra Weather: सोसाट्याचा वारा अन् मुसळधार! राज्यातील 'या' भागांना पाऊस झोडपणार

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT