Gold Price Today: हद्दच झाली! घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; एका क्लिकवर बघा आजचा भाव...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gold-Silver Rate : आज सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन दिवसांत सराफ बाजारात सोन्याचे भाव कमी झाले होते. परंतु आज (बुधवार 28 ऑगस्ट) सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशावेळी आजचे भाव कितीने वाढले जाणून घेऊया. (gold-silver prices hike today 28 august 2024 in maharashtra know the details)

ADVERTISEMENT

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (27 ऑगस्ट 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 030 रूपये होता. पण आज यामध्ये 220 रूपयांनी वाढ झाली असून तो 73, 250 रूपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही 210 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. एक किलो चांदीची किंमत 88,500 रूपये इतकी झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Maharashtra Weather: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार! IMD चा 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,150 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,250 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,940 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,150 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,250 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,940 रूपये आहे.

नागपूर

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,150 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,250 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,940 रूपये आहे.

नाशिक

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,180 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,280 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,970 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : 70 वर्षांच्या वृद्ध महिलेची बलात्कार करुन हत्या, आरोपीने दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला अन्...

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT