Gold Prices Today: आता सोनं घ्यायचं की नाही?, आजचा सोन्याचा भाव विचारूच नका!
Gold-Silver Price Hike : सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोने-चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. अशावेळी आज (26 ऑगस्ट) कृष्ण जन्माष्टमीच्यादिवशी सोन्याचे भाव कितीने वाढले आहेत जाणूत घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे.
सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसणार.
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Price Hike : सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोने-चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर यामध्ये घसरण पाहायला मिळाली होती पण आता हे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. अशावेळी आज (26 ऑगस्ट) कृष्ण जन्माष्टमीच्यादिवशी सोन्याचे भाव कितीने वाढले आहेत जाणूत घेऊयात. (gold-silver prices rises today 26 august 2024 on krishna Janmashtami in maharashtra know the details)
ADVERTISEMENT
खरं तर, आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आहे. मात्र शनिवारी (24 ऑगस्ट) देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर प्रचंड वाढले होते. हे दर रविवारी आणि आज म्हणजेच सोमवारी सारखेच आहेत.
हेही वाचा : Crime News : 'डिअर अहो, बाय'; काळीज पिळवटून टाकणारी 'सुसाईड नोट'! डॉक्टरची पतीमुळे आत्महत्या?
Goodreturns वेबसाइटनुसार, 24 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) 73,040 रूपये होता. अशावेळी आठवड्याच्या पहिल्या दिवाशी म्हणजे आज (सोमवार 26 ऑगस्ट) सोन्याचा भाव तोच कायम आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 100 रूपयांनी घटली असून 88,000 रूपयांवरून आता 87,900 रूपये इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 040 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 780 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 040 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 780 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 040 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 780 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 980 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 रूपयांनी घटली असून 73, 070 रूपयांवरून 73,060 रूपये झाली आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 810 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : PAK vs BAN: "ये खांद्यावरून हात..."; पाकिस्तानच्या संघात वादाची ठिणगी? शाहीन-मसुदचा VIDEO होतोय व्हायरल
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT