12th November 2024 Gold Rate : आता सोनं 80 हजार पार नाही! मग... पाहिलेत का 1 तोळ्याचे भाव?
Gold-Silver Price Today 12 Nov 2024 : सणासुदीचा हंगाम संपताच सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या मात्र आता यामध्ये थोडेफार बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सणासुदीचा हंगाम संपताच सोने-चांदीच्या दरात चढ-उतार
लग्नसराईचा मोसम जवळ आलेला असताना सोन्याच्या भावात कोणता बदल?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Price Today 12 Nov 2024 : सणासुदीचा हंगाम संपताच सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या मात्र आता यामध्ये थोडेफार बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नसराईचा मोसम जवळ आलेला असताना सोन्या-चांदीच्या या किंमती ग्राहकांना दिलासा देणार की, खिशाला फटका बसवणार हे येणाऱ्या काळातच समजेल. चला मग आजच्या (12 नोव्हेंबर 2024) सोने-चांदीच्या किंमतीतील बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices today 12 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune nashik nagpur)
ADVERTISEMENT
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात कुठे थंडी तर, कुठे पावसाच्या सरी! आज IMD चा अंदाज काय?
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (11 नोव्हेंबर 2024) 24 carat 10 gm (1 तोळा) सोन्याचा भाव 78,760 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 1, 470 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 77,290 रूपये झाली आहे. तर, 22 carat सोन्याचा भाव 72,200 रूपये होता. त्यातही 1,350 रूपयांनी घट झाली असून त्याची किंमत 70,850 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 91,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Sharad Pawar : ...म्हणून मी भुजबळांना मुख्यमंत्री करणं टाळलं, पवारांचं खळबळजनक विधान, अजितदादांवरही निशाणा
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold Rate 22, 24, 18 carat in Mumbai
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,290 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,970 रूपये आहे.
Gold Rate 22, 24, 18 carat in Pune
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,290 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,970 रूपये आहे.
Gold Price 22, 24, 18 carat in Nagpur
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,290 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,970 रूपये आहे.
10gm 22, 24, 18 carat in Nashik
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,880 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,320 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,000 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 carat सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 carat सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT