Gold Rate: सोन्याच्या किंमतीत मोठी घट! 1 तोळा मिरवून वाढवा आपली वट, पाहा आजचे भाव...
Gold-Silver Rate Today : सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला आता ब्रेक लागल्याचं दिसत आहे. कारण, मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच काल आणि आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला आता ब्रेक?
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज नवीन बदल
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Rate Today : सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला आता ब्रेक लागल्याचं दिसत आहे. कारण, मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच काल आणि आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला होता, अशात आज (09 ऑक्टोबर) सोन्याच्या किंमती घटल्या आहेत. हे बदल किती रूपयांनी झाले आहेत यावर एक नजर टाकूयात. (Gold-Silver rate down 24 22 and 18 carat gold today 09 october 2024 in maharashtra mumbai Pune nagpur what are the prices know)
ADVERTISEMENT
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (08 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,450 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 760 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 76,690 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये होता. जो 700 रूपयांनी घटला असून त्याची किंमत 70,300 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 94,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा : Bigg Boss 18: सदावर्ते जाणार जेलमध्ये? आकांडतांडव, राडा अन्… सदावर्तेंचा कहरच
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,690 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,520 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,690 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,520 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,690 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,520 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,330 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,720 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,530 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! टेन्शन घेऊच नका, 'या' तारखेला मिळतील चौथ्या-पाचव्या हफ्त्याचे पैसे
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT