Gold Prices: बाईईई... काय खरं नाही! सोनं आता आवाक्याबाहेरच... बघितले का 1 तोळ्याचे भाव?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

point

ग्राहकांचं टेन्शन वाढलं असून खिशाला कात्री बसरणार

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Hike Today : महाराष्ट्रात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज, शुक्रवार 27 सप्टेंबर 2024 रोजी, सोन्याच्या दरात तेजी कायम असल्याचं दिसून येत आहे. गुरूवारी सोन्याचे दर स्थिरावलेले दिसले पण आज पुन्हा एकदा सर्वकालीन उच्चांक गाठत आहेत. सणासुदींच्या दिवसांत सोने-चांदीच्या दरात ही मोठी उसळी आहे. सोनं पहिल्यांदाच 77 हजारांच्या वर गेलं आहे. अशातच आता ग्राहकांचं टेन्शन वाढलं असून खिशाला कात्री बसरणार आहे. त्यामुळे आजचे (27 सप्टेंबर) सोने-चांदीचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (Gold-Silver rate hike today 27 september 2024 in maharashtra mumbai Pune nashik 22 24 18 carat what are the prices)

ADVERTISEMENT

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (26 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,020 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 430 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 77,450 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये होता. जो 400 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 71,000 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 1 हजार रूपयांनी वाढली असून 96,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हे वाचलं का?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,030 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,480 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,120 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Riya Barde: उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार रिया बर्डे कोण? 

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT