Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, आज शाळांना सुट्टी; Red Alert मुळे BMC चा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पावसाचं धुमशान, अवघ्या काही तासात 100 मिमी पाऊस

point

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट

point

रेड अलर्टमुळे मुंबई महापालिकेकडून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Mumbai School Holiday: मुंबई: मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' असल्याने शाळा आणि महाविद्यालयांना आज (गुरुवार, 26 सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. (very heavy rain in mumbai schools and colleges closed tomorrow bmc decision due to red alert)

ADVERTISEMENT

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान विभागाने गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देत 'रेड अलर्ट' जारी केला आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत भयंकर पाऊस, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प!

बीएमसीने सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून, बीएमसीच्या अखत्यारीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये गुरुवारी बंद राहतील."

हे वाचलं का?

बीएमसीने नागरिकांना अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी दुपारपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून, सखल भागात पाणी साचले आहे. कुर्ला ते ठाणे स्थानकांदरम्यान लोकल ठप्प झाल्याने प्रवासी अडकून पडले, तर रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

हे ही वाचा>> Maharashtra weather: काळजी घ्या! राज्यात पावसाचा धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!

रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने बुधवारी संध्याकाळी मुंबई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुपारपासून शहरातील अनेक भागात पाऊस पडत आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयएमडीने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट बदलून रेड अलर्ट केला आहे, जो गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत जारी करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

याआधी बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT