Maharashtra weather: राज्यात पावसाचा हाहाकार! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना आज हाय अलर्ट

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

point

'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा!

point

'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलच झोडपून काढलं आहे. अशा परिस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांना आज (27 सप्टेंबर) पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तुमच्या शहरात आज हवामानाचा अंदाज काय आहे जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast heavy rainfall mumbai pune red alert today 26 September 2024 know IMD weather report)

राज्यातील 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा!

आज कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वारा आणि विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचवेळी उद्यापासून (ता. २८) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे 4500 आले, मग 1500 कधी येणार?

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पालघर, नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना आज IMD कडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरलाय, तर काही ठिकाणी वाढल्याचे चित्र आहे. बुलडाणा, वाशिम, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: 'हा' सदस्य बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार? निक्की, जान्हवी Runner Up; कोण ठरणार विजेता?

 

'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  नांदेडमध्ये मध्यम सरींचा अंदाज असून लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT