पिवळ्या बांगड्या अन् मुंडकं छाटलेला महिलेचा मृतदेह, ‘ती’ गोणी बघून पोलिसांनाही फुटला घाम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

headless dead body of a woman found in a sack police registered a case of murder against the unknown person washim crime
headless dead body of a woman found in a sack police registered a case of murder against the unknown person washim crime
social share
google news

Crime News: जका खान, वाशिम: वाशिम (Washim) जिल्ह्यात एका महिलेचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह (woman Dead Body) प्लास्टिकच्या गोणीत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा शीर नसलेला मृतदेह हा एका गोणीत भरुन फेकून देण्यात आला होता. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण वाशिममध्ये एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. (headless dead body of a woman found in a sack police registered a case of murder against the unknown person washim crime)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात एका शेतातील नाल्याजवळ एक बारीक गोणी पडली होती ज्यामधून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे या गोणीत एखादा मृतदेह असावा अशी शंका येथील स्थानिकांना आली. ज्याची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच मालेगाव पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी एक मृतदेह अतिशय छिन्नविच्छन्न अवस्थेत त्यांना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केलं. पोलिसांना सुरुवातीला गोणी एका बाजूने उघडी असल्याचं दिसून आलं. त्या गोणीभोवतीच हिरवट पिवळ्या रंगाच्या बांगड्या आणि मानवी मांसाचे तुकडे आणि हाडांसह मांसाचे अवशेषही आढळून आले.

त्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी पंचनामा करून ती गोणी पूर्णपणे रिकामी केली. तेव्हा पोलिसांना देखील प्रचंड धक्का बसला. कारण हा मृतदेह एका महिलेचा होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह शीर नसलेला होता. म्हणजेच महिलेचे डोके धडापासून गायब होते. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता त्यामुळे अद्याप तरी महिलेची ओळख पटलेली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> BJP: ‘तुमची पदं भाजपमुळे हे विसरू नका’, मंत्री उदय सामंत-दादा भुसेंना भाजप सहमुख्य प्रवक्त्याने सुनावलं

मृतदेह सापडल्याने आता पोलीस महिलेचं छाटलेलं मुडंकं देखील शोधत आहेत. तसेच ही महिला नेमकी कोण होती आणि तिची हत्या कारण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे देखील सध्या शोधत आहेत. सध्या पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

थरकाप उडवणारी घटना; मुंडकं छाटलं, सापडला फक्त धडासह मृतदेह..

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील पाच संशयितांना ताब्यात घेतलेलं.

ADVERTISEMENT

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे या दोघा भावांचे शेत असून या ठिकाणी त्यांनी पेठफाटा येथून हितेश नावाच्या मजुराला शेत कामासाठी आणले होते. तेव्हापासून हितेश हा शरद आणि अलीमसोबत काम करत होता.

ADVERTISEMENT

7 फेब्रुवारी रोजी हितेश आणि शरद यांच्यात मोबाइल घेण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यात हितेशने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिली होती. यावेळी संतापलेल्या अलीम याने हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. ज्यामध्ये हितेशचा जागीच मृत्यू झालेला.

हे ही वाचा >> Crime : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?

त्यांनतर शेतमालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे घटनास्थळी आले आणि त्यांनी हा प्रकार पाहिला. यावेळी आपल्या हातून बटाईतसाठी घेतलेली जमीन जाईल, गावात बदनामी होईल या चिंतेने त्यांनी मयत हितेश याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार शरद याने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने मयत हितेश याचे शीर वेगळे करत धड गोदावरी नदीत टाकून दिल्याचे संशयितांनी पोलीस चौकशीत सांगितलेलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT