‘कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता?’ कोणी दिलं जरांगे पाटलांना थेट आव्हान?
Maratha Reservation: कल्याणमधील ओबीसी समाज संघटनेच्या सभेत ओबीसी नेत्यांनी थेट मराठा आरक्षणालाच विरोध केला आहे. तसेच जरांगे पाटलांचा राजहट्ट, बालहट्ट सरकारने पुरवू नये. असं विधानही यावेळी करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation: कल्याण: ‘जरांगे-पाटलांचा राज हट्ट किंवा बाळ हट्ट सरकारने पुरवू नये, कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता?’ असा थेट सवाल ओबीसी समाज संघटनेचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव यांनी केला. ओबीसी समाज संघटनेचा आज (23 नोव्हेंबर) डोंबिवली जवळील पिंपळेश्वर मंदिरात मेळावा होता. या मेळाव्यात मराठ्यांना ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला. (if the reservation does not stand in the court thev why should give reservation to maratha community who gave a direct challenge to manoj jarange)
ADVERTISEMENT
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमधील ओबीसी समाज देखील एकवटला आहे.
हे ही वाचा >> Exclusive: मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ चूक केली? छगन भुजबळ म्हणाले, ‘ते’ माझे बॉस..
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाचा मागणी करणारे मराठा समाजाचे आत्ताचे नेते मनोज जरांगे पाटील सगळे नियम ढाब्यावर बसून सभा घेतात दौरे करतात. मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका होती. मात्र आता मराठ्यांना आरक्षण का? असा सवाल आम्ही करतोय. मनोज जरांगे हे नावापुढे पाटील लावतात तर पाटील असतील तर त्यांना आरक्षणाची गरज काय? पाटील म्हणून त्यांना आरक्षण मागण्याचा अधिकार नाही. मराठयाना ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण हवंय ही बाब अतिशय चुकीची आणि घटनाबाह्य आहे.’
हे वाचलं का?
‘सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण अनेक वेळा नाकारलं असं असताना देखील हा त्यांचा राजहट्ट किंवा बालहट्ट असेल तर सरकारने पुरवलाच नाही पाहिजे. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. या विरोधात कल्याण तालुक्यात मोठी सभा होणार असून आम्ही विरोध करणार.’ असं विश्वनाथ जाधव यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Exclusive: आरक्षण… जरांगे-पाटील ते मुख्यमंत्री… छगन भुजबळांची बेधडक मुलाखत जशीच्या तशी!
ते पुढे असंही म्हणाले की, ‘आमच्या समाजाच्या आमदारांच्या गाड्या अडवता, फोडता.. घर जाळता.. त्यांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केलाय का? सरकारने या सर्वांकडे लक्ष दिले पाहिजे.. कोर्टात टिकत नसेल तर आरक्षण कसं काय देता? असा ही यावेळी जाधव यांनी केला.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगरसेवक गंगाराम शेलार, गुलाब वाजे, अर्जुन बुवा चौधरी, प्रकाश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, माजी नगरसेवक रवी पाटील, दत्ता वजे, जन् मोर्चा उपाध्यक्ष दशरथ पाटील, समाजसेवक उद्योगपती दिनेश जाधव आदी लोक उपस्थित होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT