Income Tax New Slabs: टॅक्स भरणाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा; सरकारने दिले गिफ्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने जाहीर केलेली नवीन आयकर रचना कशी आहे?
प्राप्तिकर रचनेमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोदी सरकारने आयकर रचनेमध्ये मोठा बदल केला

point

नवीन आयकर रचना कशी असणार आहे?

point

स्टॅण्डर्ड डिडक्शनमध्ये काय बदल करण्यात आला?

New income tax slabs : मोदी सरकारने मध्यम वर्गीयांना आणि आयकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी स्टॅण्डर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवून 50 हजार रुपयांवरून 75 हजार केली आहे. त्याचबरोबर आयकर रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. (what is standard deduction in income tax)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या आयकर रचनेत मूळ सवलत मर्यादा वाढवली नाही. त्याचबरोबर टॅक्स दरातही कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. जुनी कर रचनेची निवड करणाऱ्यांना स्टॅण्डर्ड डिडक्शनचा फायदा मिळणार नाही. 

Union Budget 2024 : नोकरदारांसाठी काय?

केंद्र सरकार या अर्थसंकल्पामध्ये दिलासा देईल, अशी अपेक्षा नोकरदार वर्गाला होती. सरकारने स्टॅण्डर्ड डिडक्शन वाढवले आहे आणि आयकर रचनेतही बदल केला आहे. नवीन आयकर रचनेमुळे करदात्यांचे कमीत कमी 17500 हजार वाचू शकतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> तरुण-तरुणींना महिन्याला 5000 रुपये! अर्थसंकल्पात मोठी घोषणा 

New Income Tax new Slabs : नवी आयकर रचना कशी आहे?

- 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल. 
-3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पत्नासाठी 5 टक्के आयकर असेल.
-7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर असेल. 
-10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के आयकर असेल.
-12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के आयकर असेल.
15 लाख आणि त्यापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के आयकर असेल.

income tax slabs new regime
नवीन आयकर रचना कशी असेल? कुणाला किती टक्के कर भरावा लागणार?

Income tax slabs 2023 : सध्या आयकर रचना कशी आहे?

-0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी शून्य टक्के आयकर. 
-3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर.
-6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर.
-9 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के आयकर.
-12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के आयकर.
15 लाख आणि त्यापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के आयकर.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप आमदार अडचणीत! हायकोर्टाने पोलिसांना झापले, प्रकरण काय?

2020 मध्ये सरकारने नवीन आयकर रचना आणली होती. ही कर रचना करदात्यांना फारशी आवडली नव्हती. त्यात गेल्या दोन वर्षांमध्ये बदल करण्याता आले. पूर्वी सहा स्लॅब होते. ते बदलून पाच स्लॅब करण्यात आले. त्याचबरोबर 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य आयकर लावण्यात आला होता. नव्या आयकर रचनेमध्ये बेसिक सूट मर्यादा 3 लाख करण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT