Trade Deficit Record High : भारतात एवढ्या सोन्याची आयात, अर्थव्यवस्था धोक्यात? काय सांगतात आकडे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसात देशातील व्यापार तूट मोठी वाढल्याचं पाहायला मिळतंय. तंत्रज्ञान, जागतिक मागणी आणि देशांतर्गत खर्चाच्या चढ-उतारामुळे भारताची व्यापार तूट नोव्हेंबरमध्ये विक्रमी पातळीवर पोहोचली. सोन्याच्या आयातीत झालेली प्रचंड वाढ हे या वाढीचं प्रमुख कारण आहे. या वाढत्या व्यापारी तुटीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याचीही शक्यता आहे. आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2024 साठी भारताची व्यापार तूट $37.84 बिलियनवर पोहोचली असून, ती ऑक्टोबरमधील $27.14 अब्ज डॉलरपेक्षा खूप जास्त आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार नोव्हेंबरमध्ये व्यापार तूट $23.9 अब्ज असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

ADVERTISEMENT

विक्रमी पातळीवर सोन्याची आयात!

नोव्हेंबरमध्ये भारतात सोन्याची विक्रमी आयात झाली. विशेष म्हणजे ऑक्टोबरमधील $7.13 वर असलेला हा आकडा नोव्हेंबरमध्ये $14.8 अब्जवर पोहोचला. हा आकडा दुपटीपेक्षाही जास्त आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे अनेक आयातदारांनी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवला होता. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि आयातही वाढली. सोन्याच्या आयातीतील ही वाढ हे व्यापारी तुटीचे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या आयातीत सुमारे 50% वाढ झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये निर्यातीत घट

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Zakir Hussain यांचा ज्यामुळे मृत्यू झाला, तो IPF आजार नेमका काय? काय आहेत लक्षणं आणि उपचार?

 

ऑक्टोबरमधील $39.2 अब्जच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये भारताची एकूण व्यापारी निर्यात (माल निर्यात) 4.9% ने घसरून $32.11 अब्ज झाली. जागतिक मागणीत घट आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यासाठी महत्वाचं कारण मानलं गेलं आहे. नोव्हेंबरमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 49.7 टक्क्यांनी घसरून 3.7 अब्ज डॉलरवर आली आहे. विशेष म्हणजे, या घसरणीनंतरही, कच्च्या तेलाची आयात 7.9% ने वाढून $16.1 अब्ज झाली.

ADVERTISEMENT

या वाढत्या व्यापारी तुटीचा परिणाम सोमवारी विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झालेल्या भारतीय रुपयावरही झाला आहे. ही परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी आव्हानात्मक असू शकते. चालू खात्यातील तूटही वाढणार असल्याचा धोका यामुळे वाढला आहे.

ADVERTISEMENT

भारताची निर्यात वाढेल का?

भारताचे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणतात, वस्तूंच्या निर्यातीत घट झाली असली तरी, पुढील चार महिन्यांसाठी गैर-पेट्रोलियम निर्यात आणि सेवा वाढणार असल्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये भारताची एकूण निर्यात $800 अब्ज ओलांडू शकते असाही सरकारचा अंदाज आहे. भारत सरकार यावर्षी आणि पुढील वर्षी 20 देशांमध्ये निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. यासाठी 6 उत्पादन क्षेत्र आणि 6 सेवांची निवड करण्यात आली आहे ज्यात निर्यात वाढवण्याची मोठी क्षमता आणि क्षमता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT