iPhone 16 लॉन्च! आता आयफोन 15, 14 आणि 13 किती रूपयांनी होणार स्वस्त?
Apple iPhone 16 : Apple ने आता आपली iPhone 16 ही नवीन सीरीज सोमवारी 9 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च केली आहे. या स्मार्टफोन्ससोबतच ब्रँड आपल्या जुन्या फोनच्या किंमतीही कमी करणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
Apple ने आता iPhone 16 ही नवीन सीरीज लॉन्च केली आहे.
आयफोनच्या 'या' सीरीज किती रूपयांनी होणार स्वस्त?
नवीन iPhones मध्ये काय असेल खास?
Apple iPhone 16 : Apple ने आता आपली iPhone 16 ही नवीन सीरीज सोमवारी 9 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे, कंपनी या सीरीजचे iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार नवीन फोन लॉन्च केली आहे. (iphone 15 iphone 14 and iphone 13 expected price cut after iphone 16 launch what is the difference about it)
या स्मार्टफोन्ससोबतच ब्रँड आपल्या जुन्या फोनच्या किंमतीही कमी करणार आहे. आयफोन कमी किंमतीत विकत घेता यावा म्हणून अनेक जण या संधीची वाट पाहत होते. कंपनी iPhone 15, iPhone 14 सह अनेक मॉडेल्सची किंमत कमी करणार आहे. हे फोन किती स्वस्त होणार जाणून घेऊयात.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500
आयफोनच्या 'या' सीरीज किती रूपयांनी होणार स्वस्त?
अलीकडेच अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत, ज्यामध्ये iPhone 15 ते iPhone 13 च्या किंमतीची माहिती देण्यात आली आहे. कंपनी हे स्मार्टफोन 10 ते 12 हजार रुपयांनी स्वस्त करू शकते. यामुळे, आयफोन 16 सीरिजच्या लॉन्चसह, हे फोन अधिक लोकप्रिय झाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
म्हणजेच iPhone 15 ची किंमत 79,600 रुपयांवरून 69,600 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. यासोबतच तुम्हाला बँक ऑफर आणि इतर फायदेही मिळतील. दुसरीकडे, कंपनी iPhone 15 Plus ची किंमत 89,600 रुपयांवरून 79,600 रुपयांपर्यंत कमी करू शकते. कंपनी अधिक सवलत देखील देऊ शकते.
याशिवाय, कंपनी प्रो आणि प्रो मॅक्स म्हणजेच iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max बंद करू शकते. याशिवाय कंपनी iPhone 13 आणि iPhone 14 Plus देखील बंद करू शकते. म्हणजेच तुमच्याकडे नवीन iPhones सोबत iPhone 15, iPhone 15 Pro आणि iPhone 14 चा पर्याय असेल. कंपनी iPhone 14 ची किंमत 10 हजार रुपयांनी कमी करू शकते.
ADVERTISEMENT
नवीन iPhones मध्ये काय असेल खास?
iPhone 16 Pro A18 Pro चिपसह येतो. जे 16-कोर न्यूरल इंजिनसह जोडले गेले आहे. iPhone 15 Pro बद्दल बोलायचे झाले तर यात A17 Pro चिप आहे. दोघांना 6-कोर GPU मिळतात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Big Boss Marathi 5: 'जरा हटके अन् गुलीगत फटके', निक्की-अरबाजला कॅप्टन सूरज दाखवणार मराठी पॅटर्न!
याशिवाय, iPhone 16 Pro मध्ये 48MP फ्यूजन, 48MP अल्ट्रावाइड आणि 12MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी यात 12MP सेन्सर आहे. दुसरीकडे, 15 प्रो मध्ये 48MP मुख्य, 12MP अल्ट्रावाइड आणि 12MP टेलिफोटो लेन्स आहेत. सेल्फीसाठी यात 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
iPhone 16 Pro च्या बॅटरीचा आकार बदलला आहे. कंपनीच्या मते, बॅटरी एका चार्जवर 27 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. तर 15 Pro मधील बॅटरी 23 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देण्यास सक्षम आहे. कंपनीने बॅटरीचा आकार जाहीर केलेला नाही.
ADVERTISEMENT