Maharashtra Weather : राज्यात कुठे थंडी तर, कुठे पावसाच्या सरी! आज IMD चा अंदाज काय?
दिवाळीनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. पण आता तापमानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात थंडी, तर काही ठिकाणी ऊन आणि पावसाच्या सरी... असं चित्र आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दिवाळीनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडीची चाहुल लागल्याने थोडा दिलासा
मुंबई शहर-उपनगरात हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather Update : दिवाळीनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. पण आता तापमानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात थंडी, तर काही ठिकाणी ऊन आणि पावसाच्या सरी... असं चित्र आहे. अशावेळी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडीची चाहुल लागल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. चला तर मग आज (12 नोव्हेंबर 2024) तुमच्या शहरात वातावरण कसं असणार आहे जाणून घेऊया.... (maharashtra weather forecast update Today 12 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune kolhapur nagpur)
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिमाण इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Sharad Pawar : ...म्हणून मी भुजबळांना मुख्यमंत्री करणं टाळलं, पवारांचं खळबळजनक विधान, अजितदादांवरही निशाणा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवसांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली, लातूर, धाराशीव, सोलापूरमध्येही हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Bunty Shelke : काँग्रेस उमेदवार पळत पळत थेट भाजप कार्यालयात, नागपूरमध्ये काय घडलं? व्हिडीओ का व्हायरल होतोय?
मुंबई शहर आणि उपनगरात हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात दिवसभर उष्णता आणि रात्री गारठा तर सकाळी धुके पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबईत सकाळच्या सुमारास थंडी जाणवत आहे, या भागात पुढील 2 दिवसात तापमान आणखी घटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT