1 जानेवारीला ISRO कडून ऐतिहासिक लाँचिंग, उलगडणार ब्रम्हांडाचं रहस्य

मुंबई तक

भारतामधील अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता पुन्हा एक नवा इतिहास रचला जाणार आहे. श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून XPoSAT हा उपग्रह या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रक्षेपित केले जाणार आहे.

ADVERTISEMENT

ISRO will create history again the new XPoSAT satellite will reveal the secrets of the universe
ISRO will create history again the new XPoSAT satellite will reveal the secrets of the universe
social share
google news

XPoSAT: भारतामधील अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून (ISRO) अनेक मोठ मोठ्या प्रकल्पांवर कामं केली जात आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता इस्रोकडून पुन्हा एक नवा इतिहास रचणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून XPoSAT हा उपग्रह (Satellite) या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रक्षेपित केले जाणार आहे. हा उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या स्रोतांची छायाचित्रेही सॅटेलाईटच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत.

तेजस्वी स्त्रोतांचा अभ्यास

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोडण्यात येणारा XPoSAT मध्ये जी दुर्बीण बसवण्यात आली आहे ती रमण संशोधन संस्थेतून बनवण्यात आली आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. त्या प्रकारे पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हाचा अभ्यास केला जाईल असंही सांगण्यात आले. ज्या तेजस्वी स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे त्यासाठी हा उपग्रह 650 किमी उंचीवर सोडण्यात येणार आहे.

हे ही वाचा >> Nagpur: बहीण-भावाला चिरडलं, संतप्त जमावाने ट्रकच पेटवला!

इस्त्रोची ऐतिहासिक मोहीम

या उपग्रहाची ज्या प्रकारे आज चर्चा केली जाते त्याची तयारी इस्त्रोकडून 2017 पासूनच केली गेली होती. या मोहिमेसाठी इस्त्रोकडून 9.50 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले. प्रक्षेपणानंतर XPoSAT उपग्रह सुमारे 22 मिनिटे त्याच्यासाठी नियुक्त केलेल्या कक्षेत तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या XPoSAT उपग्रहामध्ये दोन पेलोड आहेत. त्यातील पहिला आहे, POLIX आणि दुसरा आहे XSPECT.

Polix बद्दल…

पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड असून हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटरच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. 126 किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉनचा अभ्यास केला जाणार आहे. हे 8-30 keV श्रेणीच्या एनर्जी बँडचाही अभ्यास केला जाणार आहे.

पोलिक्सपेक्षा कमी एनर्जी

XSPECT म्हणजे एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ. ते 0.8-15 keV श्रेणीच्या एनर्जी बँडचा अभ्यास केला जाणार आहे. म्हणजेच, ते पोलिक्सपेक्षा कमी एनर्जी बँडचा अभ्यास केला जाणार आहे. हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, लो-मॅग्नेटिक, न्यूट्रॉन स्टार, मॅग्नेटार्सचा अभ्यास केला जाणार आहे.

PSLV  दोन वेळा अयशस्वी

या XPoSAT उपग्रहाचे वजन 469 किलो असून त्यामध्ये प्रत्येकी 144 किलोचे दोन पेलोड आहेत. संभाव्य प्रक्षेपण 25 डिसेंबर आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे ते प्रक्षेपित केले जाईल. आतापर्यंत पीएसएलव्ही रॉकेटची 59 उड्डाणे झाली असून त्यातील दोन प्रक्षेपण अयशस्वीही झाली आहेत.

हे ही वाचा >> Maratha Reservation: जरांगे पाटलांचं ठरलं म्हणाले, ‘…तर आम्ही फडणवीसांच्या घरात जाऊन बसू’

हे वाचलं का?

    follow whatsapp