IIT बाबाकडे सापडला गांजा! पोलिसांनी अटक करताच म्हणाला 'महाकुंभचा प्रसाद', नेमकं घडलं तरी काय?

IIT Baba Arrested : महाकुंभमध्ये प्रकाशझोतात आलेला आयआयटी बाबा अभय सिंगला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती.

ADVERTISEMENT

Police Arrested IIT Baba
Police Arrested IIT Baba
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयआयटी बाबाच्या जयपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

point

बाबाकडे पोलिसांना सापडले गांजा आणि अंमली पदार्थ

point

आयआयटी बाबाने दिली होती आत्महत्येची धमकी

IIT Baba Arrested : महाकुंभमध्ये प्रकाशझोतात आलेला आयआयटी बाबा अभय सिंगला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. पोलिसांनी या बाबाचं लोकेशन ट्रेस करून त्याला जयपूरच्या रिद्धी-सिद्धी परिसरातील हॉटेलमध्ये पकडलं. बाबाकडे गांजा आणि ड्रग्ज मिळाले. अभिय सिंगला आयआयटी बाबा म्हणून ओळखलं जातं. त्याने सुसाईडची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या आयआयटी बाबाला जेरबंद केलं. शिप्रापथ पोलीस ठाण्याचे सीआय राजेंद्र गोदारा यांनी टीमसोबत हॉटेलमध्ये छापा टाकून बाबावर अटकेची कारवाई केली.

रुम तपासताना पोलिसांना मिळाला गांजा

हॉटेल रुमची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गांजा सापडला. तसच पोलिसांनी त्या ठिकाणाहून काही अंमली पदार्थही जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी आयआयटी बाबावर कारवाई केली. पोलीस या प्रकरणी तपास करत असून बाबाने आत्महत्येची धमकी का दिली, याचा शोधही घेत आहेत. तसच बाबाकडे सापडलेल्या अंमली पदार्थांच्या सोर्सचीही माहिती घेतली जात आहे. बाबाच्या विरुद्ध याआधी कोणते गुन्हे दाखल आहेत का, याचाही पोलीस तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> अल्पवयीन गर्लफ्रेंडसोबत रोहित लिंगायतची हाय व्होल्टेज टॉवरला गळफास लावून आत्महत्या

याप्रकरणी अभय सिंग उर्फ आयआयटी बाबाने प्रतिक्रिया देत म्हटलं की, थोडा प्रसाद (गांजा) मिळालेला आहे. मी पोलिसांना म्हटलं की, या प्रसादावर केस कराल, तर महाकुंभमध्ये एवढे लोक पितात, सर्वांना अटक करा. भारतात तर ही समजून घेणारी गोष्ट आहे. दरम्यान, पोलिसांनी आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आयआयटी बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा >> "घटना अंधारात कोपऱ्यात झाली नाही, त्या मुलीला...", पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं खळबळजनक विधान!

प्रयागराज महाकुंभात अभय सिंग आयआयटी बाबाच्या नावानं खूप लोकप्रिय आहे. महाकुंभमध्ये आयआयटी बाबाने माध्यमांशी संवाद साधून अनेक खळबळजनक विधानं केली होती. भारत-पाकिस्तान सामन्याची भविष्यवाणी करत बाबाने म्हटलं होतं की, भारत पाकिस्तानविरोधात सामना जिंकणार नाही. परंतु, भारताने तो सामना जिंकला आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बाबाला खूप ट्रोल केलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp