ठाण्यात बॅनर ‘वॉर’! आव्हाडांना डिवचलं, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सवाल
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करणारे होर्डिंग लावले आहे. शरद पवारांमुळे आनंद दिघेंना जामीन मिळाला होता, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
ADVERTISEMENT
maharashtra politics news : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड असा सत्तासंघर्ष सातत्याने दिसून आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर हा संघर्ष चांगलाच टोकाला गेला होता. त्यात आता ‘शरद पवारांनी मदत केली नसती तर आनंद दिघे यांच्यावरील टाडा रद्द झाला नसता’, या आव्हाड यांच्या विधानानंतर ठाण्यात पुन्हा आव्हाड विरुद्ध शिवसेना यांच्यात ठिणगी पडली आहे. या विधानानंतर शिवसेनेने ‘आव्हाड छप्पराणे’, म्हणत डिवचलं आहे. (Jitendra Awhad eknath Shinde political tussle in thane)
ADVERTISEMENT
राज्याचं सत्ताकेंद्र सध्या ठाण्यात सरकलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे. याच ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत राजकीय संघर्ष वाढू लागला आहे.
त्यातच आव्हाडांनी केलेल्या एका विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, “आनंद दिघे यांना जामिनासाठी शरद पवार यांनी मदत केली. पवारांनी ठरवलं असतं, तर आनंद दिघे टाडाच्या केसमधून बाहेर आले नसते.”
हे वाचलं का?
ठाण्यात झळकले होर्डिंग, आव्हाडांवर ‘बाण’
शिवसेनेकडून ठाण्यात होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर आनंद दिघे यांचा मोठा फोटो आहे. फोटोच्या बाजूलाच उबाठा सैनिकांनो, हे तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सैनिकांना करण्यात आला आहे.
हेही वाचा >> ‘मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन’, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं मोठं विधान
या होर्डिंगवर लिहिलं आहे की, “सुरक्षा कमी करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारख्या दरारा असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भीती दाखवायचा निष्फळ प्रयत्न करणारे पळपुटे तुम्ही… साहेबांना जामीन देणारे तुम्ही कोण? धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी मदत (ती ही तुमच्याकडे?) मागितली असं बरळता? थुंकीविकास आघाडीचे थेंब आहात तुम्ही. आव्हाड, छप्पराने… बनायचा उद्धवटपणा करू नये.”
ADVERTISEMENT
नरेश म्हस्केंकडून आव्हाडांवर प्रश्नांची सरबत्ती
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काही प्रश्न आव्हाडांना विचारले आहेत. “जितेंद्र आव्हाड, धर्मवीर आनंद दिघे यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे, ते जरा भान ठेवून करा. ते आनंद दिघे बोलले त्यांना धर्मवीर बोलायला लाज वाटते का? शरद पवारांमुळे जमीन मिळाला असं म्हणता तर शरद पवार काय तेव्हा न्यायाधीश होते का? न्यायालय शरद पवार साहेब चालवत होते का? शरद पवार साहेबांनीच आनंद दिघे यांना जेलमध्ये टाकलं होतं का? याचं स्पष्टीकरण आव्हाडांनी द्यावं”, असे सवाल म्हस्केंनी केले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Mira Road Murder : लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापायच्या मशीनने केले तुकडे
ठाण्यात शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेने ठाकरे गटाबरोबरच जितेंद्र आव्हाडांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाड यावर काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT